सोशल नेटवर्किंग फोरम : दरी व अवघड चढणावरून गावापर्यंत पोहचवले पाणी वाजवड पाणी प्रकल्पाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 01:05 AM2018-04-15T01:05:35+5:302018-04-15T01:05:35+5:30

पेठ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून सोशल नेटवर्किंग फोरम जलाभियानांतर्गत पेठ तालुक्यातील वाजवड या गावाला टँकरमुक्त करणारी पाणीपुरवठा योजना गावकऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली.

Social Networking Forum: Opening of Water Vajbad Water Project, reaching the village on the cliff and difficult climb | सोशल नेटवर्किंग फोरम : दरी व अवघड चढणावरून गावापर्यंत पोहचवले पाणी वाजवड पाणी प्रकल्पाचे लोकार्पण

सोशल नेटवर्किंग फोरम : दरी व अवघड चढणावरून गावापर्यंत पोहचवले पाणी वाजवड पाणी प्रकल्पाचे लोकार्पण

Next
ठळक मुद्देफेब्रुवारी महिन्यात वाजवडचे काम हाती घेतले अतिशय डोंगराळ प्रदेशात वसलेले वाजवड हे गाव उंचावर

पेठ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून सोशल नेटवर्किंग फोरम जलाभियानांतर्गत पेठ तालुक्यातील वाजवड या गावाला टँकरमुक्त करणारी पाणीपुरवठा योजना गावकऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेद पाड्याचा पाणीप्रश्न सोडवल्यानंतर पेठ तालुक्यातील वाजवड गावाचे ग्रामस्थ फोरमच्या पदाधिकºयांना भेटले आणि गावाची समस्या विशद केली. त्यानंतर गावाची प्रत्यक्ष पाहणी करून फोरमच्या सदस्यांनी फेब्रुवारी महिन्यात वाजवडचे काम हाती घेतले होते. अतिशय दुर्गम भागात असलेल्या दरीतील विहिरीपर्यंत वीज पोहचविण्याचे अवघड आणि मोठं मोठे दगड असलेल्या डोंगर चढणीतून पाइपलाइन आणण्याचे कष्टप्रद काम करत अखेर वाजवडकरांच्या दारात पाणी पोहोचवण्यात सोशल फोरमला यश मिळाले. याच प्रकल्पाचे गावातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. अतिशय डोंगराळ प्रदेशात वसलेले वाजवड हे गाव उंचावर वसलेले आहे. जुलै ते जानेवारी या दरम्यान गावाच्या आसपास असलेल्या विहिरींना पाणी असते. मात्र फेब्रुवारीनंतर या विहिरी कोरड्या पडतात. यानंतर मात्र गावाच्या महिलांच्या मरणप्राय यातना सुरू होतात. सरकारची मर्जी असल्यास काही दिवस टँकर येतो. नाहीतर गेल्या अनेक वर्षांपासून फेबुवारी ते जून या दरम्यान महिला-पुरुषांना खोल दरीत असलेल्या विहिरीतून डोंगर उतारावरील अत्यंत धोकादायक पायवाटेवरून डोक्यावर २-३ हंडे घेऊन पाणी आणावे लागते. ही परिस्थिती पाहून इंजिनिअर प्रशांत बच्छाव आणि भूगर्भ शास्रज्ञ डॉ. जयदीप निकम यांनी खालील विहिरीचे उन्हाळ्यात पाणी असण्याची क्षमता तपासली.

Web Title: Social Networking Forum: Opening of Water Vajbad Water Project, reaching the village on the cliff and difficult climb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी