अवयवदानाच्या प्रचारात सामाजिक संस्थाच पडतात कमी: सुनील देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 11:17 PM2020-01-04T23:17:14+5:302020-01-04T23:24:28+5:30
नाशिक : अवयवदान हे श्रेष्ठ दान म्हंटले गेले असले तरी समाजात अवयवदानाविषयी अनेक गैरसमज आहेत. ते दूर झाले पाहिजेत. अगदी दशक्रिया विधीच्या दिवशी किर्तन ठेवतानाच अवयवदान हे अन्य कोणाला तरी जीवनदान देणारे ठरू शकेल यासंदभातील व्याख्यान देखील झाले पाहिजे. दुदैवाने यात सामाजिक संस्था देखील कमी पडत आहेत, अशी खंत मृृत्यूंजय आॅर्गन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी व्यक्त केले.
नाशिक: अवयवदान हे श्रेष्ठ दान म्हंटले गेले असले तरी समाजात अवयवदानाविषयी अनेक गैरसमज आहेत. ते दूर झाले पाहिजेत. अगदी दशक्रिया विधीच्या दिवशी किर्तन ठेवतानाच अवयवदान हे अन्य कोणाला तरी जीवनदान देणारे ठरू शकेल यासंदभातील व्याख्यान देखील झाले पाहिजे. दुदैवाने यात सामाजिक संस्था देखील कमी पडत आहेत, अशी खंत मृृत्यूंजय आॅर्गन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी व्यक्त केले.
गेल्या काही वर्षांपासून अवयवदान जनजागृतीसाठी ते महाराष्ट्रात पदयात्रा करत आहेत. यातून आजवर १४५ गावांमध्ये ३५० च्या वर कार्यक्रम घेतले
अवयवदानाच्या प्रचारासाठी महाराष्टÑात पदयात्रा करणारे देशपांडे हे रविवारपासून (दि.५) पुन्हा पदयात्रा सुरू करीत आहेत. त्या संदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न- अवयवदान हा शब्द सध्या सुपरिचीत होत आहे. मात्र, त्यानंतरही आवश्यकतेनुसार प्रमाण वाढत नाही, त्यामागची नेमकी कारणे कोणती?
देशपांडे- आपण विकसनशील देश असलो तरी अवयवदानात अत्यंत मागे आहोत. त्याची अनेक कारणे अहेत. अंधश्रध्दा, अपुरी माहिती यामुळे प्रतिसाद मिळत नाही. वास्तविक यासंदर्भात देशपातळीवर जागृती झाली पाहिजे, श्रीलंकेत मानवी अवयव ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून ग्राह्य धरली जाते. आपल्याकडे अवयवदानाचे पुरेसे महत्व माहिती नाही, हीच खरी अडचण आहे.
प्रश्न- अवयवदान वाढविण्यासाठी नेमके काय प्रयत्न व्हावेत..
देशपांडे- अवयवदानाविषयी आपल्याकडे पुरेशी जागृती नाही नेत्र व त्वचा हे बाह्य अवयव दान करू शकतो. नैसर्गिक मृत्यू आला तर माणसांचे ३ मिनीटात अवयव निकामी होतात. मात्र त्वचा व नेत्र हे सहा तासाच्या आत दान करु शकतो. तसेच देहदान केल्यास याचा फायदा वैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना होत असतो. १० विद्यार्थ्यांमागे १ देह असणे गरजेचे आहे. त्यामुळे उत्तम डॉक्टर तयार होण्यास मदत होते. तसेच कुणाला अवयव दान केल्यास मृत्यूच्या दारात असलेल्या व्यक्तिलाही यामुळे जीवनदान मिळू शकते. हे लोकांना कळले तर पुढिल कामे सोपे होतात. लोकांचा धर्मावर मोठा विश्वास असल्याने त्यांना धार्मिक पद्धतीने समजावून सांगणे महत्वाचे असते. मी करीत असलेल्या पदयात्रा साठीच आहेत. त्यातून काही तरी चांगले बाहेर पडेल अशी अपेक्षा ठेवू या!
मुलाखत- अमोल निरगुडे