काळजीवाहक कर्मचारी कांबळे याच्या क्रुरतेने सारेच हादरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 06:19 PM2018-10-17T18:19:48+5:302018-10-17T18:25:22+5:30
नाशिक : पाठीमागून लाथ मारल्याने जमीनिवर पडलेल्या विद्यार्थ्यास मारहाण झाल्याने तो विद्यार्थी वेदनेने विव्हळत असतांनाच दुसऱ्याला विद्यार्थ्याला पलंगावरून फेकून ...
नाशिक : पाठीमागून लाथ मारल्याने जमीनिवर पडलेल्या विद्यार्थ्यास मारहाण झाल्याने तो विद्यार्थी वेदनेने विव्हळत असतांनाच दुसऱ्याला विद्यार्थ्याला पलंगावरून फेकून दिल्याने तोही जखमी झाला. एव्हढ्यावरच तो कर्मचारी थांबला नाही तर त्याने एका विद्यार्थ्याच्या कानशिलात मारल्याने त्याच्या कानाचा पडदाच फाटला. लघुशंकेसाठी उभा असलेल्या एकाच्या पाठीत लाथ घालून त्यालाही जखमी करण्यात आले. कर्मचाºयाच्या क्रुुरततेबाबत पिडीत विद्यार्थ्यांनी अनेक घटना सांगितल्याने सभापतींसह सारेच हादरले.
शासकीय अंध शाळेतील विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर बुधवारी समाजकल्याण सभापती सुनिता चारोस्कर यांना अंध शाळेतील त्या पिडीत विद्यार्थ्यांची भेट घेतली असता अंध विद्यार्थ्यांवरील आत्याचाराचा गंभीर प्रकार अधिक समोर आला. यावेळी सभापती चोरोस्कर यांनी पिडीत विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर कांबळे यांच्या क्रुरतेचे अनेक प्रकरणे समोर आले. येथील शासकीय अंध शाळेत एकुण ३५ निवासी विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांची काळजी घेण्यासाठी काळजीवाहक कर्मचारी संदीप कांबळे याची नेमणूक करण्यात आलेली आहे.
मात्र काळजीवाहकानेच या विद्यार्थ्यांना आमानुष मारहाण केल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्या पुढे आला आहे. यावेळी सुदाम पावसे या विद्यार्थ्याने घडलेल्या प्रकरणाची माहिती सभापतींना दिली. या मारहाणतीत पावसे याच्या डोक्याला बॅट लागल्याने तो जखमी झाला आहे. सागर मुरकुटे याच्या कानाशिलात लगावल्याने त्याच्या कानाचा पडदा फाटल्याने त्याला ऐकू येत नसून त्याचे पालक त्याला घरी घेऊन गेले आहेत. यावेळी येथे उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांनी कांबळे याच्या दहशतीचे किस्से सांगितले.
कांबळे यांने वारंवार विद्यार्थ्यांना लघुशंका कारतांना लाथा मारणे, पलंगावरून फेकून देणे, रोज दारू पिऊन धिंगाणा घालणे, संगणकावर पिक्चर पाहत बसणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदि गंभीर आरोप विद्यार्थांनी केले आहेत. विशेष म्हणजे हा सारा प्रकार विद्यार्थी सांगत असतांना अंधशाळेच्या अधिक्षक वाझट यांंनी मात्र आपणास याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. वाझट या शासकीय निवासस्थानी न राहाता मुंबईनाका येथे राहत असल्याचेही समोर आले. याप्रकरणी सुनीता चारोस्कर यांनी संबंधित कर्मचाºयाला तत्काळ बडतर्फ करण्याची सुचना केली आहे. याप्रकरणी स्वता: लक्ष घालून संबंधितावर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य ज्योती जाधवही उपस्थित होत्या.