सोसायटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबियांसह उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 09:50 PM2020-08-27T21:50:51+5:302020-08-28T00:37:47+5:30
मखमलाबाद : कामावर गैरहजर राहिल्याचा कारणावरून नोकरीतून कमी केलेल्या कर्मचाºयास कामावर रुजू करून घेण्यात यावे या मागणीसाठी मातोरी विविध कार्यकारी सोसायटीतील कर्मचाºयाने कुटुंबियां समवेत सोसायटीसमोर आमरण उपोषणास सुरवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

मातोरी गावातील सोसायटीत गेल्या ३२ वर्षांपासून क्लार्क पदावर शांताराम तुकाराम वामने हे कार्यरत असून, गेल्या सहा महिन्यापूर्वी ते आजारी असल्याने महिनाभर उपचारासाठी सुट्टी घेतली असता, त्यांच्या गैरहजेरीत चेअरमन आनंद धोंडगे ,तुकाराम पिंगळे ,त्र्यबक कातड यांनी शांताराम यांच्याकडील कारभार काढून घेत आनद शिंदे यांना दिला. कामा वरून कमी केल्याने शांताराम वामने यांनी वारवार विनवणी करून रुजू करण्यासाठी पाठपुरावा केला, परंतु त्यांना रुजू करून घेतले नाही. म्हणून शांताराम वामने यांनी मुलगा व पत्नीसह सोसायटीच्या समोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.