सोसायटी वाहनतळातील अतिक्रमण काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:20 AM2021-02-26T04:20:09+5:302021-02-26T04:20:09+5:30
सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने गुरुवारी नागरिकांनी केलेल्या ऑनलाईन तक्रारी तसेच अर्जावरून अंबड पोलीस स्टेशन लगत असलेल्या ...
सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने गुरुवारी नागरिकांनी केलेल्या ऑनलाईन तक्रारी तसेच अर्जावरून अंबड पोलीस स्टेशन लगत असलेल्या महेश भवन समोरील एका सोसायटीतील वाहनतळमधील अतिक्रमण काढण्याबरोबरच अन्य दोन ठिकाणच्या अतिक्रमण जेसीबी यंत्राच्या सहाय्याने पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले.
महापालिकेच्या विभागीय कार्यालयास प्राप्त झालेल्या ऑनलाईन तक्रारी तसेच तक्रार अर्जाच्या माध्यमातून गुरुवारी मनपा विभाग अधिकारी मयूर पाटील ,सहाय्यक अधीक्षक दशरथ भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात तीन ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात आले. यात प्रमुख्याने महेश भवन समोरील आदर्श सोसायटीत एका बिल्डरने पार्किंगच्या जागेत अनधिकृतपणे खोली बांधलेली होती. याबाबत मनपा ऑनलाईन तक्रार दाखल झाली होती. मनपाने जेसीबी यंत्र तसेच ब्रेकर त्या सहाय्याने पार्किंगमधील पक्के बांधकाम तोडले .याबरोबरच डीजीपी नगर येथील रवीमेेघ अपार्टमेंटच्या दुकानासमोरील तसेच पार्किंगमध्ये असलेले अतिक्रमण काढले. यानंतर महापालिकेने चेतना नगर भागातील अनधिकृत कंपाऊंडचे अतिक्रमण काढले. या मोहिमेत मनपाचे सात ते आठ वाहने , अधिकारी , कर्मचारी सहभागी झाले होते . अचानक अतिक्रमण मोहीम राबविल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे .
===Photopath===
250221\25nsk_42_25022021_13.jpg
===Caption===
पार्कींगमधील पक्के बांधकाम तोडतांना अतिक्रमण पथकातील कर्मचारी