दहशतवादविरोधात समाजाने पुढाकार घ्यावा
By admin | Published: May 21, 2017 01:48 AM2017-05-21T01:48:01+5:302017-05-21T01:48:16+5:30
नाशिक : सीमेपलीकडून देशावर लादली जाणारी दहशतवादी समस्या बंदुकीच्या जोरावर सुटणार नाही तर त्यासाठी जनजागृती आणि मानवी बुद्धीचा विकास होणे ही काळाची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सीमेपलीकडून आपल्या देशावर लादली जाणारी दहशतवादी समस्या केवळ बंदुकीच्या जोरावर सुटणार नाही तर त्यासाठी मोठी जनजागृती आणि मानवी बुद्धीचा विकास होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सुरक्षायंत्रणेसोबत समाजातील युवक-युवती तसेच ज्येष्ठ नागरिकांनी जागल्याची भूमिका निभावत दहशतवाद मुक्त नवराष्ट्र निर्मितीच्या कार्यात पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन अखिल भारतीय दहशतवादविरोधी जनआंदोलनाचे अध्यक्ष सुभाष सोनकांबळे यांनी नाशिक येथे केले.
रियल इंडियन आणि विचारपीठ समूहाचे संचालक माणिक कुणे यांच्या पुढाकाराने आयोजित संमेलनात सोनकांबळे बोलत होते. सोनकांबळे पुढे म्हणाले की, पाश्चिमात्य देशात धुमाकूळ घातलेल्या दहशतवादी संघटना भारतात शिरकाव करण्याच्या प्रयत्नांत आहेत. ही राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभावासाठी धोक्याची घंटा आहे. नाशिकसह राज्यातील अनेक प्रमुख शहरे सध्या या दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. दरम्यान, रियल इंडियन आणि विचारपीठ समूहातर्फे गरजू शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी मेजर कृष्णा खोत, पर्यावरणतज्ज्ञ विक्रांत कर्णिक, लेखक जगदिश काबरे, विजय जाधव, सतीश भारतवासी, अजय मक्तेदार, सत्यजित बच्छाव, हरिकृष्ण कुलकर्णी, वैशाली दामले, यदु पाटील, देवान कांबळे, विश्वजित गजभिये आदी उपस्थित होते.