संस्था संघटनांनी जपली सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:38 AM2018-11-13T00:38:40+5:302018-11-13T00:39:16+5:30

सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत शहरातील मानव उत्थान मंचच्या वतीने गोरगरीब, श्रमिक वर्गासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. या मंचच्या स्वयंसेवकांनी ‘शेअरिंग जॉय’ हा उपक्रम राबवून सुमारे १५०हून अधिक गरजूंना ‘दिवाळी भेट’ दिली.

 Society's commitment to the organization | संस्था संघटनांनी जपली सामाजिक बांधिलकी

संस्था संघटनांनी जपली सामाजिक बांधिलकी

Next

नाशिक : सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत शहरातील मानव उत्थान मंचच्या वतीने गोरगरीब, श्रमिक वर्गासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. या मंचच्या स्वयंसेवकांनी ‘शेअरिंग जॉय’ हा उपक्रम राबवून सुमारे १५०हून अधिक गरजूंना ‘दिवाळी भेट’ दिली. नाशिकमधील सुमारे १५० गोरगरिबांपर्यंत हे डबे स्वयंसेवक लीना पंजाबी यांच्यासह धनश्री कुलकर्णी, हेमल लदानी, प्रियंका बांगर, पंकज जोशी, पराग चौधरी, विकास ठाकरे आदींनी विविध भागांत पोहचविली.
युनिक ग्रुप
युनिक ग्रुपच्या वतीने आदिवासी पाड्यावर स्वच्छतेचा संदेश देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली. ग्रुपच्या वतीने आदिवासी पाड्यावर जाऊन दिवाळी साजरी करण्यात येते. यंदाही ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात असलेल्या चिंचुतारा या आदिवासी पाड्यावर जाऊन तेथील नागरिकांना यावर्षी स्वच्छतेचा संदेश देत कपडे, खाऊ, बिस्किटे, पेन आदी साहित्याचे वाटप ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक सतीश सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महेश सौंदाणे, वसंत चिकोडे, सुधाकर गायधनी, अनुप बागड, किशोर शिरसाठ, कैलास देवांग, अनिल जाचक, गुलाब गविल, दिगंबर काळे, ग्रामस्थ उपस्थित होते.
पाच शहरांमध्ये उपक्रम
‘शेअरिंग जॉय’ हा उपक्रम नाशिकसह मिर्झापूर, गुरूग्राम, अहमदाबाद, भोपाळ व बंगळुरू या शहरांमध्येही राबविण्यात आला. एकूण एक लाख रुपयांच्या भेटवस्तू समाजातील श्रमिक घटकांपर्यंत पोहचविण्यात आल्याचा दावा मंचाकडून करण्यात आला आहे. तसेच नाशिकमधील मातोश्री वृद्धाश्रम येथे दिवे व आकाशकंदील भेट देण्यात आले. त्याचप्रमाणे या मंचच्या लांबा कुटुंबीयांनी उद्यान बाके दिली.
रिमांड होम येथे फराळ वाटप
नाशिक जिल्हा नशाबंदी मंच या सामाजिक संस्थेच्या वतीने रिमांड होम येथे दोन लाडू एक करंजी हा दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी गं. पां. माने, डॉ. हेमलता पाटील, मनपा सभापती वैशाली भोसले, अविनाश आहेर, पां. भा. करंजकर, अ‍ॅड. गोरखनाथ बलकवडे हे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. श्याम दुसाने तर सूत्रसंचलन सूर्यकांत आहेर यांनी केले. चंद्रकांत बोंबले यांनी आभार मानले. पाहुण्यांचा सत्कार रेखा शेलार व छाया बिडलॉन, मीना चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title:  Society's commitment to the organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.