साॅफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:28 AM2021-02-21T04:28:03+5:302021-02-21T04:28:03+5:30
मालेगाव : येथील जे.ए.टी. महिला महाविद्यालयातील सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट सेल व इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने सातदिवसीय साॅफ्ट ...
मालेगाव : येथील जे.ए.टी. महिला महाविद्यालयातील सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट सेल व इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने सातदिवसीय साॅफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट सर्टिफिकेट कोर्सचे आयोजन करण्यात आले होते. इतरांना सहकार्य करण्याची क्षमता वाढविण्यासाठी आणि नवीन परिस्थितीशी कसे जुळवून घ्यावे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन प्राचार्य. डॉ अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक साॅफ्ट स्किल्स सेलच्या समन्वयक प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी केले. यावेळी डॉ. सलमा अब्दुल, डॉ. लोधी कनिझ फातिमा, डॉ. फहमिदा अन्सारी, प्रा. मुनव्वर अहमद, डॉ. खान रुमाना, डॉ. हुमायरा, डॉ. आदिल अजीझ, डॉ. इस्माईल आदींची व्याख्याने झाली. काझी मदिहा हिने सूत्रसंचालन केले. फरहा नाझ हिने आभार मानले.