मनातला बाप्पा साकारण्यासाठी अंगणातली माती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:16 AM2021-08-29T04:16:48+5:302021-08-29T04:16:48+5:30
हाच धागा पकडत नाशिकचे शिल्पकार मयूर मोरे यांच्या संकल्पनेतून तसेच मिट्टी फाउंडेशनच्या वतीने ‘अंगणातील माती’ हा अभिनव उपक्रम राबवला ...
हाच धागा पकडत नाशिकचे शिल्पकार मयूर मोरे यांच्या संकल्पनेतून तसेच मिट्टी फाउंडेशनच्या वतीने ‘अंगणातील माती’ हा अभिनव उपक्रम राबवला गेला. संस्थेच्या वतीने सव्वा फुटाची श्री गणेश मूर्ती तयार होईल इतकी लाल माती ना नफा ना तोटा या तत्त्वावर उपलब्ध करून दिली गेली. मूर्ती घडवताना फक्त या मातीत पाणी व सेंद्रिय बिया मिसळून श्रीगणेश मूर्ती साकारली जाऊ शकते. यासाठीची लागणारी सर्व शास्त्रोक्त माहिती, व्हिडिओ फाउंडेशनच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. त्यासाठी लागणारे सर्व बारकावे व इतर सर्व गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळे ज्या भक्तांना घरीच गणपती साकार करायचा होता त्यांची विशेष करून फार मोठी मदत झालेली आहे.
या पर्यावरणीय उपक्रमास अत्यंत कमी कालावधीत प्रचंड प्रतिसाद लाभला आहे.
इन्फो
लाल मातीची वैशिष्ट्ये
लाल माती पासून तयार होणाऱ्या गणपती बाप्पाला कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम रंगाची गरज नाही.
आपला उत्सव पूर्ण झाल्यानंतर घरातच या मूर्तीचे विसर्जन करता येते. त्यासाठी कोणत्याही अतिरिक्त केमिकलची अथवा विषारी द्रव्यांची गरज नाही. माती सोबत सेंद्रिय बी असल्याने विसर्जनानंतर बाप्पाचे झाड उगवते. या मुळेच आपण जल प्रदूषण करत नाही. मात्र वायू प्रदूषणालाही आळा घालता येतो.
कोट....
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत या अभिनव उपक्रमाची माहिती पोहोचावी यासाठी मिट्टी फाउंडेशनने ‘बाप्पाचे झाड’ या लघुपटाची निर्मिती केली आहे. त्यामध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेता चिन्मय उदगीरकर, ऋतुजा बागवे, राजेश पंडित व संस्कृती, पृथ्वीराज व अभिकांश असे अनेक बालकलाकार यामध्ये आहेत. २७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला आहे.
- मयूर मोरे, मिट्टी फाउंडेशन