शेती अभियानाअंतर्गत मृदादिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 06:22 PM2020-02-27T18:22:51+5:302020-02-27T18:23:19+5:30
इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते येथे शाश्वत शेती अभियानाअंतर्गत आरोग्य शेती अंतर्गत फेब्रुवारी हा महिना मृद आरोग्य पत्रिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या पाशर््वभूमीवर काळुस्ते येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मृदादिन साजरा करण्यात आला.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते येथे शाश्वत शेती अभियानाअंतर्गत आरोग्य शेती अंतर्गत फेब्रुवारी हा महिना मृद आरोग्य पत्रिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या पाशर््वभूमीवर काळुस्ते येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मृदादिन साजरा करण्यात आला. या कार्यक्र माअंतर्गत काळूस्ते या गावाची निवड करून गावातील सर्व शेतकऱ्यांना जमिनीतील माती नमुने तपासून सर्व शेतकर्यांना आरोग्य पित्रकेचे वितरण करण्यात आले. गावातील जमीन पत्रिका आधारित प्रात्यिक्षके व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. या माध्यमातून सदर गाव मॉडेल व्हिलेज करणे हा या कार्यक्र माचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्र माला उपस्थित शेतकºयांना तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तवर यांनी जमिनीच्या आरोग्य विषयी जमीन आरोग्य पत्रिका आधारित खतांचा संतुलित वापर तर मंडळ कृषी अधिकारी आर.आर. पाटील यांनी सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता नुसार वापर करणे याविषयी अनमोल मार्गदर्शन केले. यानंतर शिवार फेरी काढून रब्बी पिके प्रात्यिक्षकांची पाहणी करून संबंधित पिकांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्र माला सरपंच विनता गवारी, अनुराधा घारे, वाकचौरे, तानाजी घारे, उर्मिला घारे, रामचंद्र घारे, बाळू घारे, विठ्ठल घारे, गंगाराम घारे, नंदू घारे, नामदेव घारे,आदी. शेतकरी व कृषी पर्यवेक्षक जी.के.पानसरे, कृषी सहायक एस.के. भोये, व्ही. पी. गांगड, परिसरातील शेतकरी उपस्थित होते.