कसारा घाटात रेल्वे रुळावर मातीचा ढिगारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 01:32 AM2019-07-12T01:32:07+5:302019-07-12T01:32:47+5:30
इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसामुळे गुरुवारी (दि.११) कसारा घाटातील हिवाळा ब्रीजजवळील बोगद्याबाहेर मातीचा ढिगारा रेल्वे रुळावर पडल्याने मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले.
नाशिक : इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसामुळे गुरुवारी (दि.११) कसारा घाटातील हिवाळा ब्रीजजवळील बोगद्याबाहेर मातीचा ढिगारा रेल्वे रुळावर पडल्याने मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. वैतरणा जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य दरवाजा भागात डोंगरावरील दरड कोसळली. या घटनेत प्रकल्पात उभी असलेली वाहने वाहून गेल्याचे समजते तर प्रवेशद्वारावरील दोन पोलीस चौक्या उद््ध्वस्त झाल्या आहेत.
घाटमाथ्यावर एकाच दिवसात १७२ मि. मी. पावसाची नोंद झाली. कसारा घाटातील हिवाळा ब्रीजजवळील बोगद्याबाहेर मातीचा मोठा ढिगारा थेट रेल्वे रुळावर पडल्याने (डाउन)कडील मुंबईहून येणाºया मेल एक्स्प्रेस गाडयांची वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वे विभागाच्या आपत्ती विभागाने ढिगारा बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
यामुळे रेल्वे एक ते दीड तास उशिराने धावत आहेत. पावसाने त्र्यंबकेश्वर-जव्हार-पालघर रस्ताही बंद झाला असून त्र्यंबक-नाशिकला येणाºया मोरचुंदी पुलाच्या बाजूला रस्त्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. जव्हारहून जव्हार फाटा पुलाची वाडी, धोंड माºयाचीमेट, तळवाडा फाटा मार्गे त्र्यंबकेश्वर गाठून पुढे नाशिककडे जाता येऊ शकते. त्यामुळे या मार्गाचा वापर करावा अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
इन्फो
पावसामुळे मुंबईला वीजपुरवठा करणाºया वैतरणा जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य दरवाजा भागात डोंगरावरील दरड कोसळली. या घटनेत प्रवेशद्वारावरील दोन पोलीस चौक्या उध्वस्त झाल्या आहेत. पोलीस आणि सुरक्षा रक्षकांची हत्यारेही वाहून गेल्याचे वृत्त आहे. विजनिर्मितीचे कामही थांबवण्यात आले आहे.
——-
फोटो आहोत