सूर्यग्रहण : ढगाळ वातावरणामुळे हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 01:32 PM2019-12-26T13:32:41+5:302019-12-26T13:33:09+5:30

देशमाने : ग्रामीण भागात नऊ वर्षानंतर कंकनाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. अनेक ठिकाणी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याने या सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव घेता न आल्याने अनेकांचा हिरमोड झाला असल्याचे दिसून आले.

 Solar Eclipse: Snowy due to cloudy weather | सूर्यग्रहण : ढगाळ वातावरणामुळे हिरमोड

सूर्यग्रहण : ढगाळ वातावरणामुळे हिरमोड

Next

देशमाने : ग्रामीण भागात नऊ वर्षानंतर कंकनाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण हे उघड्या डोळ्यांनी कधीही बघू नये अशी चर्चा नेहमी होत असते म्हणून देशमाने , मुखेड फाटा , मानोरी बुद्रुक आदी परिसरात कंकनाकृती सूर्यग्रहण बघण्यासाठी काळा चष्म्या तर अनेक ठिकाणी एक्स-रे फोटोचा वापर करून सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. अनेक ठिकाणी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याने या सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव घेता न आल्याने अनेकांचा हिरमोड झाला असल्याचे दिसून आले.
दरम्यान , ग्रामीण भागात आजही सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण पाहताना अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा पाळत असून महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात सूर्यग्रहण कालावधीत अंधश्रद्धा पाळल्या जातात. घरातील पिण्याच्या पाण्याचे माठ, हांडे , खाद्य पदार्थात तुळशीचे पान मोठ्या प्रमाणात टाकले जातात. तर देवघरातील देवांना देखील सूर्यग्रहण काळात अंघोळ न घालणे अशा विविध प्रकारच्या गोष्टीवर अंधश्रद्धा बाळगल्या जात असल्याचे बघायला मिळाले आहे.
---------------------------------
दूरचित्रवाणीवरून व शालेय विद्यार्थ्यांनी सांगितल्यामुळे आम्ही सुर्यग्रहणाचा आनंद लुटला. उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण बघू नये हे माहीत होते परंतु त्यासाठी लागणारे विशिष्ट चष्मे उपलब्ध नसल्याने आम्ही एक्स-रे फोटोचा वापर केला.
-वंदना दुघड, देशमाने.

Web Title:  Solar Eclipse: Snowy due to cloudy weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक