बागलाण तालुक्यातील सौरदिव्यांची लागली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 05:08 PM2019-02-23T17:08:09+5:302019-02-23T17:09:21+5:30
खमताणे : शासनाने विजेची बचत व भारनियमावर मात करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सौरऊर्जेचे दिवे लावण्याची महत्वाकांक्षी योजना राबविली असली, तरी सध्या हे दिवे मोठ्या प्रमाणावर बंद असुन, काहींची स्थिती भंगारात जमा झाल्यासारखी आहे. अजुनही हे दिवे बिनकामाचे असल्याने ग्रामस्थांना सौरदिव्यांचा प्रकाशच दिसला नाही.

ग्रामीण भागात शासनाने सौरदिवे योजनेवर लाखोंचा खर्च केला; परंतु मुख्य हेतू यशस्वी झालेला दिसत नाही. शासन व प्रशासनाचे नियोजन विस्कटलेले दिसत आहे. ग्रामपंचायत प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसते. मोठा गाजावाजा करीत गावोगावी सौरिदवे लावले होते.
गावातील सौरदिव्यांच्या बॅटरी दुरूस्ती करण्यात येत सौरदिवे बंद आहेत. दुरूस्ती करण्याच्या बहाण्याने अनेक बॅटरी, काही ठिकाणी सौर प्लेट, तर काही ठिकाणी बल्प गायब झाले आहेत. ज्या गावात सौरदिवे लावले त्याची देखभालीची जबाबदारी संबंधित एजन्सी व ग्रामपंचायत प्रशासन पार पाडत नसल्याने सौरदिवे ही योजना संबंधित यंत्रणेला कुरणच ठरली आहे.
काही ग्रामपंचायतीत संबंधित एजन्सीने ग्रामपंचायत प्रशासनाला हाताशी धरून कागदोपत्री योजना दाखवून निधी हडप केल्याचाही प्रकार काही ठिकाणी उघडकीस आला आहे. शासनाच्या या महत्वपूर्ण योजनेचा कचरा न करता अमलात आणावी, अशी जनतेकडून मागणी होत आहे.
ग्रामीण भागात शासनाची ही योजना महत्वपूर्ण होती; परंतु काही ग्रामपंचायतीनी याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
- भगवान बागुल, मावळा संघटना अध्यक्ष.
प्रत्यक्षात कोणालाच याचे देणे-घेणे नसल्याचे दिसून येते. सौरऊर्जेचे दिवे निकृष्ट दर्जाचे तर नाहीत ना, असा प्रश्न आमच्या मनात निर्माण होत असतो.
- वैभव बागुल युवा शेतकरी.