सौरवाहिनी योजनेतून अल्पदरात वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:20 AM2017-09-14T00:20:10+5:302017-09-14T00:20:16+5:30
चंद्रशेखर बावनकुळे : नाशिक जिल्ह्यात ७७६ व्यवस्थापक नियुक्तीचे आदेश नाशिक : राज्यातील शेतकºयांना प्राधान्याने वीज जोडणी देतानाच मुख्यमंत्री सौरवाहिनीच्या माध्यमातून कृषिपंपांसाठी अल्पदरात वीज उपलब्ध करून देण्यात येईल, त्याचप्रमाणे २०२० पर्यंत महावितरणचा कारभार अपघातमुक्त करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नाशिक जिल्ह्यात गाव पातळीवरील ७७६ विद्युत व्यवस्थापक म्हणून स्थानिक युवकांना संधी देण्याचे आदेशही त्यांनी दिले.
चंद्रशेखर बावनकुळे : नाशिक जिल्ह्यात ७७६ व्यवस्थापक नियुक्तीचे आदेश
नाशिक : राज्यातील शेतकºयांना प्राधान्याने वीज जोडणी देतानाच मुख्यमंत्री सौरवाहिनीच्या माध्यमातून कृषिपंपांसाठी अल्पदरात वीज उपलब्ध करून देण्यात येईल, त्याचप्रमाणे २०२० पर्यंत महावितरणचा कारभार अपघातमुक्त करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नाशिक जिल्ह्यात गाव पातळीवरील ७७६ विद्युत व्यवस्थापक म्हणून स्थानिक युवकांना संधी देण्याचे आदेशही त्यांनी दिले.
राज्यातील वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी थेट संवाद वाढविण्यासाठी जनता दरबार सुरू केले आहे. त्याअंतर्गत नाशिकमधील पहिला जनता दरबार बुधवारी
(दि. १३) उपनगर येथील इच्छामणी लॉन्स येथे पार पडला. यावेळी ग्राहकांच्या विविध समस्यांना उत्तरे देताना ही माहिती दिली. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, डॉ. अपूर्व हिरे, जयंत जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, महापौर रंजना भानसी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या जनता दरबारच्या दरम्यान बावनकुळे यांनी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीच शिवाय दिरंगाई करणाºया महावितरणच्या अधिकाºयांची कानउघाडणीही केली.
ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना जोडण्या देण्यासाठी निधी उपलब्धतेची मोठी समस्या आहे. मात्र, तरीही स्वखर्चाने वीज जोडणी घेणाºयांना प्राधान्य दिले जात आहे, असे सांगून बावनकुळे म्हणाले की, ग्रामीण भागातील विविध खेड्यांमध्ये तत्काळ वीज पुरवठ्यासंबंधी समस्या सोडविण्यासाठी जिल्हाभरात गाव पातळीवर ७७६ ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. त्यासाठी प्रत्येक गावातील स्थानिक इलेक्ट्रिकल आयटीआय झालेल्या तरुणांची निवड करून त्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अपघातमुक्त वीज वितरणचे काम थेट जनतेच्या जीविताशी संबंधित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध केंद्र तथा उपक्रेंद्र परिसरात विद्युत प्रवाहामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी वितरणच्या कर्मचारी व अधिकाºयांनी कार्यक्षम काम करण्याची गरज असल्याचे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले. तसेच २०२० पर्यंत वीज वितरणचा कारभार अपघातमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी बावनकुळे यांच्या हस्ते ५५३ कोटी रुपये खर्चाच्या १० उपकेंद्रांचे लोकार्पण व सात उपकेंद्रांचे भूमिपजून करण्यात आले. महापारेषणचे संचालक गणपतराव मुंडे, महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे संचालक सतीश करपे आदी उपस्थित होते.मोबाइलवर बोलणाºया अभियंत्याची मंत्र्यांनी रोखली वेतनवाढ
च्वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी आलेल्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर महावितरणच्या कारभाराविषयी तक्रारींचा पाऊस पडला. या जनता दरबाराच्या माध्यमातून जिल्हाभरातील विविध भागातील शेतकºयांसह घरगुती वीज ग्राहक, औद्योगिक वीज ग्राहकांसह लोकप्रतिनिधींनीही महावितरण विरोधात आपली गाºहाणी मांडली. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ऊर्जामंत्र्यांनी अधिकाºयांना विचारणा केली असता अधिकाºयांची भंबेरी उडाली. त्यांची झाडाझडतीच बावनकुळे यांनी घेतली. इतकेच नव्हे तर, जनता दरबारातही अशाच वर्तणुकीचे प्रदर्शन करीत ग्राहकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून मोबाइलवर बोलणे सुरू ठेवले. ही बाब बावनकुळे यांच्या लक्षात येताच त्यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता विपर यांच्या दोन वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले.येवल्याला प्राधान्याने वीजजोडण्या
येवला तालुक्यात मागील काही वर्षांपूर्वी ‘महावितरण आपल्या दारी’ योजनेतील सहा हजार ७०० शेतकरी वीज अहवाल वरिष्ठ कार्यालयास तत्काळ पाठवून संबंधित शेतकºयांना वीज जोडण्या देण्यासाठी प्राधान्याने विचार करण्याचे आश्वासनही ऊर्जामंत्र्यांनी दिले. सदरची योजना आता अस्तित्वात नसली तरी या शेतकºयांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.कंत्राटी कामगारानेही मांडली समस्या
ऊर्जामंत्र्यांच्या जनता दरबारात सामान्यातील सामान्य नागरिकांना समस्या मांडण्याची संधी देण्यात आली होती. महावितरणमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाºया योगेश गिते या कामगाराने त्यांच्यासह इतर पाच जणांना गेल्या सहा महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याची तक्र ार केली. कामगार विभागाशी संबंधित असलेल्या या प्रश्नावर गंभीर होत ऊर्जामंत्र्यांनी अधीक्षक अभियंता सुनील पावडे आणि संबंधित ठेकेदाराला सायंकाळपर्यंत सविस्तर तपशील सादर करण्याचे आदेश दिले.