सौर पंप योजना शेतकऱ्यांना कागदपत्रांमुळे अडचणीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:16 AM2021-07-07T04:16:12+5:302021-07-07T04:16:12+5:30
सदर दाखला कोणत्या विभागामार्फत दिला जातो, हे शेतकऱ्यांना माहिती नसल्याने सदर दाखला घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. ...
सदर दाखला कोणत्या विभागामार्फत दिला जातो, हे शेतकऱ्यांना माहिती नसल्याने सदर दाखला घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना नाशिक येथे हेलपाटे मारावे लागतात. यामुळे मालेगाव तालुक्यात कागदपत्रे उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले अर्ज दाखल करता येणार आहेत. यासाठी शासकीय स्तरावर लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजना लवकरात लवकर घेता येईल. विद्युत वितरण कंपनी साडेतीन ते साडेसात अश्वशक्तीचे पंप सौर ऊर्जा प्राप्त करून देणार आहेत. यासाठी शासनाकडून मुख्यमंत्री सौर पंप योजना सुरू केली आहे. त्या योजनेत शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यास सांगितले आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांना आपले अर्ज भरून दाखल करण्यासाठी काही अडचणी निर्माण होत आहेत . या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सदर दाखले लवकर उपलब्ध व्हावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.