यशवंत व्यायामशाळेस नाशिक रनकडून सोलर सिस्टीम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:15 AM2021-07-29T04:15:14+5:302021-07-29T04:15:14+5:30

नाशिक : तब्बल १०५ वर्षांची परंपरा असलेल्या यशवंत व्यायामशाळेला नाशिक रन या संस्थेच्या वतीने सोलर सिस्टीम बसवून देण्यात आली. ...

Solar system from Nashik run to Yashwant Gymnasium! | यशवंत व्यायामशाळेस नाशिक रनकडून सोलर सिस्टीम !

यशवंत व्यायामशाळेस नाशिक रनकडून सोलर सिस्टीम !

Next

नाशिक : तब्बल १०५ वर्षांची परंपरा असलेल्या यशवंत व्यायामशाळेला नाशिक रन या संस्थेच्या वतीने सोलर सिस्टीम बसवून देण्यात आली. त्यामुळे व्यायामशाळेतील वापरासाठीची वीज या सोलर सिस्टीमवरून उपलब्ध होऊ शकणार आहे. तसेच व्यायामशाळेच्या दर महिन्याच्या हजारो रुपयांच्या वीजबिलातही बचत होऊ शकणार आहे.

नाशिक रन संस्थेतर्फे १५ के.व्ही.ची सोलर सिस्टीम बसवून देण्यात आला. नाशिक रनचे सचिव अनिल दैठणकर, खजिनदार अशोक पाटील आणि देशमुख यांनी यशवंत व्यायामशाळेला सदिच्छा भेट देऊन व्यायाम शाळेतील विविध उपक्रमांची माहिती घेतली. स्वागत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील यानी केले आणि व्यायामशाळेच्या कार्याचा आढावा सादर केला. तर उपाध्यक्ष रघुनाथ महाबळ यांनी व्यायामशाळेच्या स्थापनेपासून तर आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा सांगितला. सचिव दैठणकर यांनी व्यायामशाळेच्या कार्यकारिणीने जुन्या परंपरेला फाटा न देता नवीन खेळांनादेखील प्रोत्साहन देण्याचे कार्य अत्यंत प्रभावीपणे केल्याचे सांगून समाधान व्यक्त केले. १०५ वर्षांच्या वाटचालीत खूप प्रभावी कार्य करण्यासह त्यात सातत्य ठेवल्याबद्दल यशवंत व्यायामशाळेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या वेळी सोलर सिस्टीमचे काम करणारे अक्षय उद्योग कंपनीचे संचालक शेजवलकर यांचाही नाशिक रन आणि यशवंत व्यायामशाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष रघुनाथ महाबळ, कार्यकारी सदस्य आनंद खरे, प्रशांत गायकवाड, ज्युदोचे साई कोच विजय पाटील तसेच व्यायामशाळेचे खेळाडू, प्रशिक्षक संदीप शिंदे, विनायक दंडवते, योगेश शिंदे, स्वप्निल शिंदे, उत्तरा खानापुरे, गायधनी, खानविलकर, तन्वी पटेल आदी उपस्थित होते.

इन्फो

मल्लखांब, ज्युदोची प्रात्यक्षिके

व्यायामशाळेतील व्यायामाचे साहित्य, मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स, टेबल टेनिस, बॅडमिंटन, योगा, महिला जिम, ज्युदो विभाग आदी खेळांची माहिती घेतली. या मान्यवरांसमोर मल्लखांबाची आणि ज्युदो खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या प्रात्यक्षिकांनीदेखील उपस्थित मान्यवरांची मने जिंकून घेतली.

Web Title: Solar system from Nashik run to Yashwant Gymnasium!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.