शिपाई झाले लिपिक, आरोग्यसेवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 11:38 PM2020-07-31T23:38:21+5:302020-08-01T01:00:49+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या वर्ग ‘ड’च्या परिचरांना ‘क’ वर्गात पदोन्नती देण्यात आली असून, त्यामुळे एकेकाळी शिपाईपदावर काम करणारे कर्मचारी ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या वर्ग ‘ड’च्या परिचरांना ‘क’ वर्गात पदोन्नती देण्यात आली असून, त्यामुळे एकेकाळी शिपाईपदावर काम करणारे कर्मचारी आता लिपिक, आरोग्यसेवक, वाहनचालक म्हणून काम करणार आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेली पदोन्नतीची प्रक्रिया प्रशासनाने पूर्ण केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्तकेला जात आहे. दरम्यान, परिचरांना पदोन्नती देण्यात आल्यामुळे लवकरच रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेत २००५ मध्ये अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या परिचरांना त्यांच्या सेवा कालावधीचा विचार करता कालबद्ध पदोन्नती देणे आवश्यक होते. परंतु अनेक वर्षांपासून हा विषय प्रशासकीय पातळीवरच प्रलंबित ठेवण्यात आला होता. मध्यंतरी प्रशासनाने सर्व कर्मचाºयांच्या सेवाज्येष्ठतेचा विचार करून त्यांना दहा, वीस व तीस वर्षे अशा कालावधीतील वेतनश्रेणीचा लाभ दिल्यानंतर कर्मचाºयांच्या जिव्हाळ्याचा असलेला पदोन्नतीचा विषय हाती घेण्यात आला.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी या संदर्भात अधिकाºयांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अनुकंपातत्त्वावरील १२ परिचरांना वर्ग ‘क’मध्ये पदोन्नती देण्यात आली. त्याचबरोबर पाच वरिष्ठ सहायक लिपिकांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
नियमित परिचर म्हणून जिल्हा परिषदेच्या सेवेत दाखल झालेल्या दहा कर्मचाºयांना वाहनचालक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. चार कनिष्ठ लेखाधिकाºयांना सहायक लेखाधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेत गेल्या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात कर्मचाºयांचे प्रश्न निकाली काढण्यात आले असून, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी, वित्त व लेखाधिकारी महेश बच्छाव यांनी याकामी पुढाकार घेतला. जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणावर परिचरांना पदोन्नती देण्यात आल्यामुळे परिचरांची पदे रिक्त झाली असून, लवकरच ही पदे भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.