युवासेना पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे दिंडोरीतील सैनिकांत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:16 AM2021-03-01T04:16:53+5:302021-03-01T04:16:53+5:30

शिवसेनेने युवकांना न्याय मिळावा म्हणून युवासेनेची स्थापना केली व त्या माध्यमातून कार्य केले. दि २६ फेब्रुवारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ...

Soldiers in Dindori displeased with selection of Yuvasena office bearers | युवासेना पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे दिंडोरीतील सैनिकांत नाराजी

युवासेना पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे दिंडोरीतील सैनिकांत नाराजी

Next

शिवसेनेने युवकांना न्याय मिळावा म्हणून युवासेनेची स्थापना केली व त्या माध्यमातून कार्य केले. दि २६ फेब्रुवारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना दिंडोरी लोकसभा विस्तारक नीलेश गवळी यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी नियुक्त्या केल्या. मात्र, यात निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप युवासैनिकांनी केला आहे. युवासैनिक नाराज झाल्याचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून सूर निघू लागला आहे असून, युवासैनिकांनी या नियुक्त्यांना आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी व ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी नाराजी दूर करण्यासाठी तातडीने बैठक घेत डॅमेज कंट्रोल सुरू केले आहे.

नवनियुक्त पदाधिकारी यांच्या नियुक्तीने दिंडोरी लोकसभेत युवासेनेत नाराजी दिसून आली असून, उघडपणे युवासैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही प्रकारच्या मुलाखती न घेता व युवासेना आणि शिवसेना यांच्या कोणत्याही पदाधिकारी यांना विश्वासात न घेता या निवडीमुळे हा असंतोष उफाळून आला. पक्ष बदल करणाऱ्या व्यक्तींना व वरचा पदाधिकारी खाली व खालचा पदाधिकारी वर हा बदल व नियुक्त्यांमुळे ही नाराजी दिसून आली. हे सर्व युवासैनिक जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच्याकडे गेले असता, त्यांनी मध्यस्थी करून शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन काही दिवसांत तोडगा काढू, असा शब्द देऊन नाराज युवासैनिकांची समजूत काढली.

यावेळी सहसंपर्कप्रमुख पांडुरंग गणोरे, उपजिल्हाप्रमुख नितीन आहेर, चांदवड तालुकाप्रमुख विलास भवर, संगम देशमुख, किरण कावळे, आदित्य केळकर, सुनील जाधव, संजय ढगे, संदीप जाधव, राहुल गणोरे, श्याम वाघमारे, कैलास गणोरे आदींसह युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Soldiers in Dindori displeased with selection of Yuvasena office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.