महाजनपूर येथे बिबट्या जेरबंद नागरिकांमध्ये समाधान : तीन दिवसांत दुसरा बिबट्या पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 06:55 PM2018-08-16T18:55:26+5:302018-08-16T18:55:45+5:30
सायखेडा : महाजनपूर शिवारात तीन दिवसांपूर्वी वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या पकडल्याची घटना ताजी असताना गुरुवारी दुपारी पुन्हा त्याच ठिकाणी लावलेल्या पिंजºयात पुन्हा दुसरा बिबट्या अलगद आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, तर आणखी बिबट्या असल्याचा संशय असल्याने वनविभागाने तिसरा पिंजरा लावला आहे.
सायखेडा : महाजनपूर शिवारात तीन दिवसांपूर्वी वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या पकडल्याची घटना ताजी असताना गुरुवारी दुपारी पुन्हा त्याच ठिकाणी लावलेल्या पिंजºयात पुन्हा दुसरा बिबट्या अलगद आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, तर आणखी बिबट्या असल्याचा संशय असल्याने वनविभागाने तिसरा पिंजरा लावला आहे.
वन क्षेत्र कमी झाल्याने भक्षाच्या शोधात बिबट्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविला आहे. गोदाकाठ भागात गोदावरीचे खोरे असल्याने उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे लपण्यासाठी बिबट्या सातत्याने येतो; मात्र महाजनपूर, तळवाडे, भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी या शिवारात सातत्याने दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे क्षेत्र नाही, शिवाय टेकडी, डोंगर, दाट झाडी असे कोणतेही क्षेत्र बिबट्याला लपण्यासाठी नसल्याने बिबट्या या भागात आल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे.
नाशिक महानगरपालिका, सिन्नर नगर परिषद आपल्या शहरी भागातील मोकाट कुत्रे पकडून या भागात सोडतात. कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर, शेतात फिरताना दिसतात. बिबट्याला इतर ठिकाणी भक्ष मिळत नसल्याने कुत्र्यांच्या मागोव्याने या भागात सातत्याने येत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. खरीप हंगामातील पिकांची कामे शेतात सुरू असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतकºयांना शेतात जावे लागते. तीन दिवसांत दुसरा बिबट्या पकडला असून, आणखी एक असल्याचा संशय असल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे. वनविभागाच्या अधिकाºयांनी बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा. पकडलेले बिबटे परत पुन्हा या भागात सोडले जात असल्याचा दावा केला जात आहे, तरी या भागात बिबटे सोडू नये अन्यथा गावातील नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा सरपंच आशा बचवंत फड यांनी दिला आहे. त्यानंतर येवला वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारे, कर्मचारी भैया शेख, विजय टेकनर यांनी पिंजरा ताब्यात घेऊन बिबट्याला निफाडच्या वनविभागाच्या रोपवाटिकेत नेल्याचे समजते.