वाळूप्रश्नी बांधकाम व्यावसायिक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:21 AM2018-03-17T01:21:27+5:302018-03-17T01:21:27+5:30

बांधकामासाठी खरेदी केलेल्या वाळूचे पंचनामे करून त्यावर पाच पट दंड आकारणी करण्याच्या नाशिक तहसीलदारांच्या निर्णयाविरुद्ध शहरातील बांधकाम व्यावसायिक एकवटले असून, शुक्रवारी त्यांनी आपल्याकडील वाळू खरेदीच्या पावत्या, वाळू साठ्याचे छायाचित्रांचे पुराव्याच्या आधारे चुकीच्या कारवाईच्या विरोधात थेट विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.

 Solid construction company accumulates | वाळूप्रश्नी बांधकाम व्यावसायिक एकवटले

वाळूप्रश्नी बांधकाम व्यावसायिक एकवटले

Next

नाशिक : बांधकामासाठी खरेदी केलेल्या वाळूचे पंचनामे करून त्यावर पाच पट दंड आकारणी करण्याच्या नाशिक तहसीलदारांच्या निर्णयाविरुद्ध शहरातील बांधकाम व्यावसायिक एकवटले असून, शुक्रवारी त्यांनी आपल्याकडील वाळू खरेदीच्या पावत्या, वाळू साठ्याचे छायाचित्रांचे पुराव्याच्या आधारे चुकीच्या कारवाईच्या विरोधात थेट विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. या संदर्भात दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही सर्व बांधकाम व्यावसायिक असून, बांधकामासाठी अधिकृत-रीत्या वाळू पुरवठादाराकडून वाळू खरेदी केली आहे. त्याच्या पावत्याही आमच्याकडे आहेत. असे असताना नाशिकचे तलाठी व मंडळ अधिकाºयांनी साइटवर येऊन आमच्या गैरहजेरीत मोघमरीत्या वाळूचा पंचनामा केला. या पंचनाम्याबाबत कोणतीही माहिती अथवा नोटीस देण्यात आली नव्हती. अतिशय चुकीच्या पद्धतीने पंचनामे करण्यात आले असून, या संदर्भात आम्ही तहसीलदारांकडे वाळू खरेदीचे पावत्या व पुरावेही दिलेले असताना त्याचा कोणताही विचार न करता थेट दंडाच्या नोटिसा दिल्या आहेत. आता या नोटिसांच्या आधारे मालमत्तेवर बोजा चढविण्याच्याही तयारी केली जात आहे. विशेष म्हणजे आम्ही बांधकाम व्यावसायिक असून, आमचा वाळू खरेदी-विक्रीचा व्यवसाय नाही त्यामुळे बांधकामासाठीच स्वमालकीच्या जागेत साठा करून ठेवलेला असताना त्यावरही जागेचे भाडे आकारले गेले आहे, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तहसीलदार व मंडळ अधिकारी, तलाठ्यांनी केलेल्या या बेकाय-देशीर कारवाईची चौकशी करून आमच्या विरोधातील कारवाई रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही मागणी करताना बांधकाम व्यावसायिकांनी आपल्याकडे असलेल्या वाळू साठ्याची छायाचित्रे तसेच रॉयल्टी भरल्याच्या पावत्या, वाळू खरेदीच्या पावत्याही पुराव्या दाखल अधिकाºयांना सादर केल्या आहेत. यावेळी सतीश परदेशी, राजेंद्र पाटील, धनाईत अहिरे असोसिएशन, रामदास शिरसाठ, विजय रासने, राजेश पाटील, दिलीप पटेल यांच्यासह जवळपास ४५ बांधकाम व्यावसायिक होते.
प्रांत अधिकायांकडे अपील
बांधकाम व्यावसायिकांनी केलेल्या वाळू साठ्यावर पाच पट दंडाची आकारणी करणाºया नोटिसा पाठविण्याच्या नाशिक तहसीलदारांच्या कारवाई विरोधात प्रांत अधिकाºयांकडे अपील केले आहे. विशेष म्हणजे नाशिकचे तत्कालीन प्रांत अधिकारी अमोल येडगे यांनीच तहसीलदारांना बांधकाम व्यावसायिकांच्या साइटवर जाऊन तेथील वाळू साठ्याचे पंचनामे करण्याचे आदेश गेल्या आॅगस्ट महिन्यात दिले होते व त्याचाच आधार घेऊन ही कारवाई करण्यात आली होती.

Web Title:  Solid construction company accumulates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.