पर्यावरण रक्षणासाठी एकवटले हात
By admin | Published: September 30, 2015 11:42 PM2015-09-30T23:42:25+5:302015-09-30T23:43:22+5:30
सामाजिक बांधीलकी : विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी साजरा केला इको फे्रण्डली गणेशोत्सव
नाशिक : गणेशोत्सव विसर्जन काळात पाण्याचे प्रदूषण होऊ नये यासाठी विविध संस्था आणि शाळा-महाविद्यालयांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला होता. मूर्ती दान आणि निर्माल्य संकलनात शाळांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये सुरुवातीपासूनच जनजागृती करण्यात आली होती. शाडू मातीपासून बनविलेली मूर्ती, कापडी पिशव्यांचा वापर, तसेच निर्माल्य नदीत न टाकण्याबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली होती. शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला होता.
गणेशमूर्ती विसर्जनप्रसंगी विविध संस्था, संघटना तसेच शाळांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रयत्न केले. या उपक्रमामध्ये शैक्षणिक संस्थांचा सहभाग लक्षणीय होता. (प्रतिनिधी)