येवल्यात साकारणार घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 04:47 PM2017-11-30T16:47:07+5:302017-11-30T16:47:22+5:30
येवला : स्वच्छ महाराष्ट्र अभियांनांतर्गत राज्यातील ४० शहरांचे नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या सविस्तर अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता देवून, निरी या संस्थेने सदर प्रकल्पांचे मुल्यांकन केले असून सदर प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते.
येवला : स्वच्छ महाराष्ट्र अभियांनांतर्गत राज्यातील ४० शहरांचे नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या सविस्तर अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता देवून, निरी या संस्थेने सदर प्रकल्पांचे मुल्यांकन केले असून सदर प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. त्यानुसार ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत’ उच्चाधिकार समतिीच्या बैठकीत राज्यातील ४० शहरांच्या घनकचरा प्रकल्पास एकूण ११५ कोटी रु पये निधीस शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये येवला नगरपरिषदेच्या रु पये ४ कोटी ४६ लक्ष रु पये किंमतीच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा समावेश असून त्याला शासनाची मान्यता मिळाली आहे.
येवला नगरपरिषदेसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला शासनाने प्रशासकीय मान्यता देवून यासाठी ४ कोटी ४६ लक्ष रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला शहर ‘स्वच्छ व सुंदर’ रहावे यासाठी येवला नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करून शासनास पाठविण्याबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी व येवला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना आर्थररोड जेलमधून पत्राद्वारे सूचना दिल्या होत्या. सदर प्रस्तावास शासनाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच येवला शहरातील घनकचºयासाठी व्यवस्थापन प्रकल्प साकारण्यात येणार आहे.