ठाणगाव येथे वनविभागच्या वतीने सौरदिवे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 05:46 PM2019-05-30T17:46:31+5:302019-05-30T17:46:48+5:30
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील वनविभागाची संयुक्त वनव्यवस्थापन समितीचा वतीने ठाणगावमधील वाड्या वस्तीवरील लोकांसाठी सौर दिवे देण्यात आले.
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील वनविभागाची संयुक्त वनव्यवस्थापन समितीचा वतीने ठाणगावमधील वाड्या वस्तीवरील लोकांसाठी सौर दिवे देण्यात आले.
ठाणगाव येथे गेल्या दहा वर्षापासून ठाणगाव येथील संयुक्त वनव्यवस्थापन समतिी स्थापन करण्यात आलेली आहे. समितीच्या वतीने जंगलाची राखणी करणे, नविन विविध जातीच्या वृक्षाची लागवड करणे, गवत राखणे व ते विकणे या कामातून या समतिीकडे येणाऱ्या अनूदानातून समितीने वाड्या वस्त्यावर राहणाºया लोकासाठी सौर दिवेची ठिक-ठिकाणी उभारणी करण्यात आली आहे.
संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोहीदास रेवगडे, वनविभागाचे वनपाल डी. व्ही. तूपलोंढे, वनरक्षक किरण गोर्डे, रवींद्र काकड, राजू वारे, भारत गांगुर्डे, काशिनाथ कातोरे आंदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.