समाधान : स्वच्छ ग्राम स्पर्धा समितीकडून जुनीबेजची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 02:54 PM2020-08-06T14:54:06+5:302020-08-06T14:56:27+5:30
कळवण : ग्रामीण जनतेचे आरोग्यमान व पर्यायाने जीवनस्तर उंचावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, या उदद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा या अभियानाअंतर्गत जुनीबेज गावातील ग्रामस्थांचा सहभाग, स्वच्छतेच्या कामकाजाची तपासणी करण्यासाठी समतिीने जुनीबेज गावाला भेट देऊन गावातील विविध भागांची पहाणी करु न समाधान व्यक्त केले.

या समितीचे प्रमुख दिंडोरी पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी जिभाऊ शेवाळे, विस्तार अधिकारी ठाकरे, खंबाईत, आण्णा गोपाळ, गोवर्धने व कळवण पंचायत समतिीचे विस्तार अधिकारी महाले यांनी जुनी बेज ग्रामपंचायतीला आज भेट देऊन कामकाजाची तपासणी व पहाणी केली.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दशरथ बच्छाव, कळवण बाजार समिती संचालक शीतलकुमार अहिरे उपसरपंच वैशाली अहिरे ग्रामपंचायत सदस्य संजय बच्छाव, कैलास पाटील यांनी गावातील स्वच्छतेची माहिती समितीला देऊन समतिी समवेत गावाची पहाणी केली. ग्रामस्थांचा सक्रि य व सातत्यपूर्ण सहभाग वाढावा, ग्रामीण जनतेला स्वच्छतेची सवय लागावी त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेतली जात असून तालुक्यातील जुनीबेज ओझर, बिलवाडी, काठरे दिगर या गावांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. ग्रामपंचायतच्या वतीने स्पर्धा परीक्षण समतिीच्या सदस्यांचा सभागृहात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शंकर वाघ, उज्वला पवार,बापू चौरे, सोसायटी संचालक बळवंत बच्छाव रमेश बच्छाव संजय बच्छाव कृष्णा बच्छाव विनोद खैरनार ग्रामसेवक नितीन बच्छाव प्रा. शिक्षक दादाजी बच्छाव, दिनेश गावित,आरोग्य सेविका अहिरे,संघनक संगणक परिचारक प्रफुल बच्छाव प्रदीप सूर्यवंशी संजय केदारे नविगरे आदी उपस्थित होते.