ब्राह्मणवाडेत राष्ट्रीयीकृत बॅँक सुरू झाल्याने समाधान
By admin | Published: February 18, 2016 11:02 PM2016-02-18T23:02:26+5:302016-02-18T23:02:57+5:30
ब्राह्मणवाडेत राष्ट्रीयीकृत बॅँक सुरू झाल्याने समाधान
नायगाव : सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे युनियन बॅँक आॅफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बॅँकेची शाखा सुरू झाल्याने शेतकरी व ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नायगाव खोऱ्यात युनियन बॅँक ही एकमेव राष्ट्रीयीकृत बॅँक असून, तिची शाखा नायगाव येथे आहे. या शाखेत नायगावसह जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, सोनगिरी, जोगलटेंभी व निफाड तालुक्यातील सावळी, पिंपळगाव निपाणी
आदि गावांतील ग्राहकांची येथे नेहमीच गर्दी होत असते. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागते. ग्राहकांची ही गैरसोय टाळण्यासाठी ब्राह्मणवाडे येथे युनियन बॅँकेची शाखा सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती.
शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन ब्राह्मणवाडेत युनियन बॅँकेची शाखा सुरू करण्यात आली आहे. बॅँकेचे क्षेत्रीय प्रबंधक दीपक कांबळे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. नायगाव खोऱ्याच्या विकासात्स्रा युनियन बॅँकेचा मोलाचा वाटा असल्याचे गोदा युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण सांगळे यांनी सांगितले. ग्राहकांना बॅँकिंग व्यवहारासाठीच्या सर्व सुविधा शाखेतच उपलब्ध करून देण्याची मागणी गोदा युनियनचे माजी संचालक रामदास बोडके, सरपंच सुनील गिते, पोपट आव्हाड यांनी केली. यावेळी ग्राहकांना एटीएम कार्ड व कर्ज धनादेश वितरित करण्यात आले.
याप्रसंगी बरकत सोहील, पी. डी. गिते, देवराम गिते, कैलास गिते, गोदा युनियनचे संचालक मीननाथ कातकाडे, संतू पानसरे, कैलास गिते, दगू दिघोळे, दिलीप घुगे, भाऊसाहेब रामराजे, तबाजी वाघ, संतोष घोलप, संतोष गिते आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाखा अधिकारी एस. बी. पाडवी यांनी आभार मानले. (वार्ताहर)