ब्राम्हणवाडे येथे शिवार रस्त्याच्या कामामुळे समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 05:38 PM2018-11-23T17:38:40+5:302018-11-23T17:39:03+5:30

नायगाव - सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथे शिवार रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. चौदाव्या वित्त आयोगातून होत असलेल्या या शिवार रस्त्याच्या कामाचा शुभारंभ पंचायत समितीचे माजी गटनेते उदय सांगळे यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आला.

Solution to the work of Shivar road at Brahmanwade | ब्राम्हणवाडे येथे शिवार रस्त्याच्या कामामुळे समाधान

ब्राम्हणवाडे येथे शिवार रस्त्याच्या कामामुळे समाधान

Next

नायगाव - सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथे शिवार रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
चौदाव्या वित्त आयोगातून होत असलेल्या या शिवार रस्त्याच्या कामाचा शुभारंभ पंचायत समितीचे माजी गटनेते उदय सांगळे यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आला. शेतकर्यांना शेतमाल ने-आण करण्यासाठी सोय व्हावी या उद्देशाने या शिवार रस्यांचे काम होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ब्राम्हणवाडे शिवारातील वाड्या वस्त्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांचे मजबूतीकरण व्हावे अशी मागणी होती.
आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे व जिल्हा परिषद सदस्य सुनिता सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होत आहे. यावेळी गाव अंतर्गत रस्ते व भूमिगत गटार योजनेच्या कामांचेही जिल्हा परिषद सदस्य सुनिता सानप यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत असलेल्या कामांमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त होत आहे. यावेळी सरपंच मंगला दिलीप घुगे, उपसरपंच सुनिल गिते, चिंचोलीचे माजी सरपंच संजय सानप, ग्रामपंचायत सदस्य सुनिल रामराजे, संजय गिते, भिमा गिते, मंदाबाई माळी, संजय आव्हाड, गोपिनाथ अमृते, गोदा युनियनचे संचालक कैलास गिते, पोपट माळी, ग्रामसेवक जी. आर. वटाणे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.



 

Web Title: Solution to the work of Shivar road at Brahmanwade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.