गावातील विजेचा प्रश्न सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 05:10 PM2018-12-26T17:10:33+5:302018-12-26T17:14:45+5:30

पिंपळगाव बसवंत : वडनेर भैरव येथील आदिवासी वस्तीवरील रोहित्र (ट्रान्सफॉर्मर ) गेल्या काही सहा महिन्यांपासून नादुरुस्त आहे. तो रोहित्र नादुरुस्त असल्याकारणाने येथील घरघुती लाईट बंद आहे. त्यामुळे ते रोहित्र त्वरित बदलून विद्युत यंत्रणा सुरळीत करावी यासाठी मुख्य अभियंता प्रकाश भोये यांना आदिवासी शक्ती सेने कडून निवेदन देण्यात आले.

Solve the electricity issue in the village | गावातील विजेचा प्रश्न सोडवा

बंद असलेल्या विद्युत यंत्रणे संदर्भात विज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता प्रकाश भोये यांना निवेदन देताना वडनेर कोकण टेंभी येथील ग्रामस्थ व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य.

Next
ठळक मुद्देआदिवासी शक्ती सेनेचे विज चितरण कंपनीला निवेदन

पिंपळगाव बसवंत : वडनेर भैरव येथील आदिवासी वस्तीवरील रोहित्र (ट्रान्सफॉर्मर ) गेल्या काही सहा महिन्यांपासून नादुरुस्त आहे. तो रोहित्र नादुरुस्त असल्याकारणाने येथील घरघुती लाईट बंद आहे. त्यामुळे ते रोहित्र त्वरित बदलून विद्युत यंत्रणा सुरळीत करावी यासाठी मुख्य अभियंता प्रकाश भोये यांना आदिवासी शक्ती सेने कडून निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि, गेल्या काही महिन्यांपासून येथील रोहित्र नादुरु स्त असल्याने घरगुती लाईटचा त्रास येथील नागरीकांना सहन करावा लागत आहे. सध्या पाच सहा दिवसापासून लाईट कायमचीच बंदच पडली असल्यामुळे दैनंदिन समस्या निर्माण झाल्या आहेत.
शिवाय गावातील विज यंत्रणा सिंगल फेजची आहे व रोहित्र देखील वारंवार नादुरुस्त असते. त्यामुळे ग्रामस्थांना अंधारात राहावे लागत आहे. विभाग कर्मचारी देखील आडमुठे धोरण अवलंबत असतात याकरीता रोहित्र बदलून लाईटचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अन्यथा आदिवासी संघटना रस्त्यावर उतरेल असा इषारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी आदिवासी शक्ती सेनेचे चांदवड तालुका अध्यक्ष बळीराम वाघ, वडनेरचे अध्यक्ष अंकुश वाघ, कैलास कडाळे, योगेश कडाळे, केदु गवळी, संतोष कडाळे, तुषार वाघ, शांताराम गांगुर्डे, योगेश काळे, पंडित वाघ, रोशन कडाळे, अतुल जाधव, सुनील काळे, विलास गवळी, राजेंद्र गांगुर्डे, दत्तु तिडके, महेंद्र्र काळे, चेतन डंबाळ आदी उपस्थित होते.
 

Web Title: Solve the electricity issue in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक