शिक्षकांच्या वेतन, फरक बिलांच्या समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:10 AM2021-03-30T04:10:25+5:302021-03-30T04:10:25+5:30
जिल्ह्यातील विनाअनुदानितवरून २० टक्के अनुदानास पात्र ठरलेल्या व २० टक्केवरून ४० टक्के अनुदान प्राप्त होणाऱ्या सर्व शाळांच्या अनुदानाची ...
जिल्ह्यातील विनाअनुदानितवरून २० टक्के अनुदानास पात्र ठरलेल्या व २० टक्केवरून ४० टक्के अनुदान प्राप्त होणाऱ्या सर्व शाळांच्या अनुदानाची सर्व बिले दिनांक ३१ मार्चपर्यंत देणे, १९०१ या हेड खालील ३ शाळा १० तुकड्या यांचे डिसेंबर २० व जानेवारी २१ची बिले पारित झाल्यानंतर उर्वरित जानेवारी, फेब्रुवारी २१ची बिले मार्चपर्यंत देण्याचे आश्वासन दिले. यापूर्वीची थकीत बिले (वैद्यकीय बिले, सातव्या वेतन आयोगाचा फरक व इतर फरक बिले) मंजुरीसाठी पुणे संचालक कार्यालयाकडे पाठवून त्यांची मंजुरी आल्याबरोबर ३१ मार्चच्या आत पारित करण्याचा प्रयत्न राहील. ज्या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी परतावा ही प्रकरणे प्रलंबित असतील ती त्वरित निकाली काढण्यात येतील. भविष्य निर्वाह निधीमधील प्रकरणाबाबत वैद्यकीय आणि घरातील मंगल कार्यासाठी प्राधान्याने बिले पारित करण्यात येतील. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी, रजा रोखीकरण ही प्रकरणे त्वरित पारित करण्याचा प्रयत्न असल्याचे उदय देवरे यांनी सांगितले. तसेच शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात यावेळी चर्चा करून त्यातूनही मार्ग काढण्याचे आश्वास देवरे यांनी दिले.
याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, कार्याध्यक्ष एस. बी. शिरसाट, सचिव एस. बी. देशमुख, उपाध्यक्ष प्रदीप सांगळे, पुरूषोत्तम रकिबे, बी. के. नागरे, अनिल माळी, एन. वाय. पगार, शरद गिते, एस. एस. जगदाळे, अनिल देवरे, सुभाष भामरे, आर. टी. जाधव, आर. एस. गायकवाड, एस. के. चकोर तसेच विनाअनुदानित कृती समितीचे नाशिक जिल्हा अध्यक्ष भरत भामरे, विभागीय अध्यक्ष कांतिलाल नेरे, एस. एस. जगदाळे, राजाराम मोरे, गोकुळ महाले, एस. एस. ढाकणे, सुनील डुकरे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : २९सिन्नर १
नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे अधीक्षक उदय देवरे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
===Photopath===
290321\29nsk_4_29032021_13.jpg
===Caption===
नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे अधीक्षक उदय देवरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.