जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 05:57 PM2021-02-02T17:57:26+5:302021-02-02T17:58:36+5:30
पेठ : जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पेठ : जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांना दिलेल्या निवेदनात कोरोना काळात शाळांच्या वेळेबाबत निर्णय घ्यावा, चट्टोपाध्याय व मुख्याध्यापक पदोन्नती, सेवानिवृत्ती नादेय दाखले, वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आर .के. खैरनार, कार्याध्यक्ष विनायक ठोंबरे, अर्जुन ताकाटे, कोषाध्यक्ष बाजीराव सोनवणे,नंदकुमार गायकवाड,रवींद्र देवरे उपस्थित होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांना निवेदन देताना आर .के. खैरनार, विनायक ठोंबरे, अर्जुन ताकाटे, बाजीराव सोनवणे, नंदकुमार गायकवाड, रवींद्र देवरे आदी. (०२ पेठ १)