जिल्हाअंतर्गत वाहतूकीनंतर काही बसेस शहरापर्यंत सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 10:44 PM2020-08-13T22:44:06+5:302020-08-13T23:50:20+5:30
नाशिक : जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असल्याने स्थानिक प्रवाशांना जवळच्या गावात जाणे सुलभ झाले आहे . अर्थात जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक ीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने महामंडळाला तोटा सहन करून बसेस सुरू ठेवाव्या लागत आहेत. महामंडळाने आता यामध्ये अधिक व्याप्ती वाढविल असून पाच तालुक्यांमधील बसेस थेट नाशिक शहराला जोडण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

गेल्या मार्च महिन्यापासून राज्य परिवहन महामंडळाला आर्थिक संकटाशी सामना करावा लागत आहे अॅनलॉकच्या परिस्थितीनंतर शासनाच्या आदेशानुसार जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नऊ डेपोंमधून प्रवाशांच्या सोयीसाठी बसेस सुरू करण्यात आल्या. परंतु या बसेसला अजूनही प्रतिसाद मिळू शकलेला नाही.
पेठ मार्गावरील तसेच सिन्नर मार्गावरील बसेस वगळता अन्य बसेस अजूनही प्रवाशांच्या प्रतीक्षेत आहेत. काही बसेसला तर एक ते दोन इतकेच प्रवासी असतात. त्यांची वाहतूक करण्याची वेळ चालक-वाहकंवर येते. जिल्हाअंतर्गत वाहतुकीला प्रवासी मिळत
नसताना आता प्रवाशांच्या
सेवेसाठी शहरापर्यंत बसेसे वाढविल्या आहे.महामर्गाावरुन प्रवाश्यांची होते पायपीटमहामार्ग बसस्थानक तसेही मध्यवर्ती ठिकाणी नाही. त्यामुळे महामार्गावर उतरलेल्या प्रवाशांना पायपीट करावी लागते.
रिक्षा बंद असल्याने आणि रिक्षात प्रवास करण्यासही प्रवाशी तयार नसल्याने महामार्ग येथून शहरात अन्यत्र जाण्यासाठी प्रवाशांची पायपीट होत आहे. काही प्रवाशी रिक्षाने देखील प्रवास करीत आहेत. एकीकडे जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक सुरु असताना
जिल्ह्यातील काही बसेसचा प्रवास वाढविण्यात आला आहे. सटाणा, कळवण, येवला, पिंपळगाव आणि सिन्नर या पाच डेपोंच्या बसेस थेट नाशिकला जोडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाश्यांची सोय झाली असली तरी पायपीटही होत आहे.
नाशिकला येणाऱ्या आणि नाशिकहून जाणाºया प्रवाशांची यामुळे सोय झाली आहे. या बसेसेला प्रतिसाद देखील मिळत आहे. तालुक्यातील या बसेस शहरातील महामार्ग बसस्थानक येथे येऊन तेथूनच सुटत आाहेत. बसेस सुटण्याच्यावेळी संपुर्ण बस सॅनिटाईझ केली जाते असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.