काही कंत्राटी कामगारांना नाही मानधन, तर काहींना कोरोना ओसरताच कामावरून केले कमी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:11 AM2021-07-10T04:11:17+5:302021-07-10T04:11:17+5:30
नाशिक : काेविडच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय व काेविड केअर सेंटरमध्ये आराेग्य कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी काही अकुशल कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर बाह्य ...
नाशिक : काेविडच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय व काेविड केअर सेंटरमध्ये आराेग्य कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी काही अकुशल कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर बाह्य संस्थेमार्फत नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांपैकी कुणाचा एक, तर कुणाचा दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे संबंधीत कामगारांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे, तर काही कंत्राटी कामगारांना जूनपासून कामावरून कमी करण्यात आले आहे.
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत एकाचवेळी सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारापर्यंत पाेहाेचली हाेती. एवढ्या माेठ्या प्रमाणात असलेल्या रुग्णांना सेवा देण्यास आराेग्य यंत्रणा कमी पडत असल्याने अनेक ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांची बाह्य स्रोतांमार्फत नेमणूक करण्यात आली. हे कर्मचारी आराेग्य कर्मचाऱ्यांना मदत करण्याचे काम करीत हाेते. या कर्मचाऱ्यांनी काेराेनाच्या कालावधीत उत्तम सेवा बजावली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. तसेच काेराेनाची साथ कमी हाेण्यासही मदत झाली. मात्र, मे महिन्यानंतर कोरोनाच कहर कमी होऊ लागल्यावर कुणाला मागील दोन, तर कुणाला एक महिन्यापासून सेवा बजावत असताना त्यांना मानधन देण्यात आले नाही. काही कंत्राटी कामगारांना जूनच्या प्रारंभीच कामावरून कमी केल्याने त्यांच्यापुढे नवीन रोजगार शोधण्याचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये निराशेचे वातावरण आहे.
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
इन्फो
काेराेना वाॅर्डात काम करताना रुग्णांची सेवा करण्याबराेबरच त्यांना मदत करीत असतो. कोराेनाचा कहर असताना तर एकाही मिनिटाची फुरसत नव्हती. मात्र, दोन महिन्यांपासून मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण झाली आहे.
- लक्ष्मण वालझाडे
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
दोन महिन्यांपासून मानधन न मिळणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र, अजूनही मानधन मिळाले नाही. आता जगावे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मानधन मिळत नसल्याने घरीदेखील पैसे पाठवता येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
- किसन जावंदे
मे महिन्याच्या अखेरपर्यंत कामावर ठेवले होते. मात्र, कोरोनाचा कहर ओसरताच कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ कोरोना काळात आमच्याकडून जीवतोड काम करून घेतात. कोरोना संपला की, आमची गरज संपली म्हणून काढून टाकतात, हे योग्य नाही.
-काशीनाथ बेंडकुळी
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
बाॅक्स
त्रुटी दाखवून मानधन कपातीचा धाेका
-रुग्णालयातील काही वस्तूंच्या रखरखावाता काही उणीव राहिल्यास किंवा कुणामुळेही काही तुटफूट झाल्यास तेवढी रक्कम मानधनातून कपात केली जाणार असल्याचे कंत्राटात कंपनीने लिहून घेतले आहे. त्यामुळे वेतन देतेवेळी विविध कारणे सांगून मानधनात कपात केली जाण्याची शक्यता असते.
- त्यामुळे आधीच वेतन कमी, त्यात पुन्हा कपात हाेते. त्यात मानधन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचारी चिंतेत आहेत.
---------------
ही डमी आहे.