काही मिळकतधारकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:10 AM2021-07-12T04:10:00+5:302021-07-12T04:10:00+5:30

सावरकर चौक ते पेठेनगर कॉर्नर रस्त्यालगत सप्तशृंगी सोसायटी, गुरुकृपा सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, महारुद्र कॉलनी, आयटीया सोसायटी, जाखडीनगर, ...

Some property owners voluntarily removed the encroachment | काही मिळकतधारकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढले

काही मिळकतधारकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढले

Next

सावरकर चौक ते पेठेनगर कॉर्नर रस्त्यालगत सप्तशृंगी सोसायटी, गुरुकृपा सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, महारुद्र कॉलनी, आयटीया सोसायटी, जाखडीनगर, सह विविध अपार्टमेंट व सोसायटी आहेत त्यामुळे आणि परिसरातील नागरिकांना शहरात ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते. परिसरातील नागरीकरण वाढत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी अरुंद पडत होत असल्याने वाहतुकीस अडचण निर्माण होत असल्याने नागरिकांची रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाची मागणी नागरिकांनी केली होती.

सुमारे वीस वर्षांनंतर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी १८ मीटर रस्त्याचे मोजमाप नगररचना विभागाकडून करण्यात येऊन सावरकर चौक ते पेठेनगर कॉर्नर रुंदीकरणात अडथळा ठरणारे आठ मिळकतधारकांनी अतिक्रमण केल्यामुळे त्यांना मार्किंग करून नोटीस देण्यात आली आहे. सदर अतिक्रमण येथे दहा दिवसांत स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. त्यापैकी काही मिळकतधारकांनी स्वयंस्फूर्तीने मार्किंग केलेले अतिक्रमण काढून घेतले; परंतु अद्याप काही मिळकतधारकांनी अतिक्रमण काढले नसल्याने त्यांच्यावर अतिक्रमण विभाग कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

110721\11nsk_4_11072021_13.jpg

मार्कींग केलेले अतिक्रमण भिंत

Web Title: Some property owners voluntarily removed the encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.