कोई लौटा दे, मेरे बिते हुए दिन...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 11:20 PM2022-03-07T23:20:33+5:302022-03-07T23:21:11+5:30
नांदगाव : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला येथील स्वयंसिद्धा महिला मंडळाने ह्यस्वयंसिद्धांची वारी, ज्येष्ठांच्या दारीह्ण हा उपक्रम राबविताना शहरातील ज्येष्ठ महिलांच्या घरी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या व आस्थेने विचारपूस केल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ह्यकोई लौटा दे मेरे बिते हुए दिन...ह्ण अशा शब्दांत या ज्येष्ठ महिलांनी आपली मने मोकळी केली. नवीन पिढीला दिशा दाखवा त्यांची दशा होणार नाही असा संदेश देताना, आज माझ्यातल्या आईला तिच्या मुली भेटल्या अशी आर्त भावना व्यक्त करीत भेटायला गेलेल्या महिलांचे डोळे पाणावले.

शहरातील सामाजिक कार्य करणाऱ्या व कर्तृत्व दाखविणाऱ्या सत्तरी ते नव्वदीत असलेल्या महिला विजया आहेर, शकुंतला कवडे, गुप्ता काकी, कंचन सेठी, वनमाला कासलीवाल, वैजयंती धामणे, सुनीता गोपलानी, लीलाबाई येवले यांच्या घरी स्वयंसिद्धा महिला मंडळ पोहोचले आणि त्यांना विविध विचारांचा खजिनाच जणू गवसला. भेटून छान वाटलं इथपासून तर महिन्यातून एकदा तरी आमच्याकडे येत जा, हे आमंत्रण महिला दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ महिलांनी ज्युनिअर महिलांना देऊन जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. घरात स्वच्छता ठेवतो तशी सार्वजनिक ठिकाणीसुद्धा स्वच्छता ठेवा. पुढच्या पिढीला समजून घ्या, जुन्या नव्या पिढीतला संवाद वाढला तर जग सुखी होईल, नवीन पिढी बिघडली आहे असे मानू नका. त्यांच्याकडची ऊर्जा
महिलांचा आत्मसन्मान वाढवा
जुन्या-नव्यातली विसंगती संगतीमध्ये बदलावी, पुरुषांनी तयार केलेल्या व्यासपीठाबरोबर आपलेही व्यासपीठ असावे, जागतिक महिला, दिनाच्या निमित्ताने सामाजिक स्पर्शातून महिलांचा आत्मसन्मान वाढावा या भावनेतून हा उपक्रम सुरू केल्याची माहिती स्मिता दंडगव्हाळ यांनी दिली. विद्या देवरे, आशा दर्डा, आशा सुराणा, वैशाली दुसाणे, वंदना कवडे, शैला आहेर, अलका धामणे, राजकुमारी गोपलानी, सुजाता बडजाते, पल्लवी कासार, पंकजा चांडक, कल्पना सेठी, रत्ना कासलीवाल, सुषमा काळे आदी महिला या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.