सोमेश्वरला दूषित पाण्यामुळे दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:47 AM2018-06-12T00:47:22+5:302018-06-12T00:47:22+5:30

सोमेश्वर महादेव मंदिराजवळील नाल्यातून दुर्गंधीयुक्त व फेसाळलेल्या अवस्थेतील दूषित पाणी थेट गोदावरी नदीपात्रात सोडले जात आहे. यामुळे गोदावरी नदी दूषित होऊन रोगराई पसरण्याची भीती नागरिकांकडून होत आहे.

 Someshwara is bad for contaminated water | सोमेश्वरला दूषित पाण्यामुळे दुर्गंधी

सोमेश्वरला दूषित पाण्यामुळे दुर्गंधी

Next

गंगापूर : सोमेश्वर महादेव मंदिराजवळील नाल्यातून दुर्गंधीयुक्त व फेसाळलेल्या अवस्थेतील दूषित पाणी थेट गोदावरी नदीपात्रात सोडले जात आहे. यामुळे गोदावरी नदी दूषित होऊन रोगराई पसरण्याची भीती नागरिकांकडून होत आहे. शहर व परिसरातील भाविक व पर्यटक, नागरिकांचे दूषित पाण्याच्या दुर्गंधीने आरोग्य धोक्यात आले आहे. गोदापात्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेतर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी गोदावरी नदीपात्रालगत असलेल्या नाल्यांच्या दुर्गंधीयुक्त पाणी थेट गोदापात्रात सोडले जात असल्याने गोदावरी प्रदूषणमुक्त कशी होणार? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. गंगापूररोडवरील श्रीक्षेत्र सोमेश्वर दररोज भाविक दर्शनासाठी येत असून, सुटीच्या दिवशी या ठिकाणी भाविकांच्या बरोबर पर्यटकही मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. याठिकाणी येणारे भाविक व पर्यटक गोदापात्रालगत असलेल्या श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिराच्या निसर्गरम्य परिसराचा विलोभनीय आनंद लुटतात. असे असताना या मंदिरालगत असलेल्या नाल्याचे पाणी थेट गोदापात्रात वाहत असून, त्यामुळे दुर्गंधी पसरवण्याबरोबरच साथीच्या रागांनाही आमंत्रण दिले जातात. याकडे मनपा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाने डोळेझाक केल्याचे दिसून येत असून, भाविक व पर्यटकांमध्ये नाराजी पसरते आहे. दरम्यान, संबंधित विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष घालून या नाल्याच्या पाण्याचा बंदोबस्त करावा व गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यास हातभार लावावा, अशी मागणी भाविक व परिसरातील नागरिकांकडून होत आहे. 
श्रीक्षेत्र सोमेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनासाठी आमच्यासारखे कितीतरी लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात, परंतु परिसरात दुर्गंधी पसरल्याने आमच्यासारखे भाविक नाराज होऊन, चुकीचा संदेश भाविकांमध्ये जातो. मंदिर परिसरात प्रसन्न वातावरण असले पाहिजे, सुगंध दरवळला पाहिजे. - मोहन दीक्षित, भाविक
मंदिर परिसरातील उघड्या नाल्यामुळे दूषित पाण्यामुळे दुर्गंधी पसरते याबाबत संबंधित विभागाला अनेक वेळा सांगून झाले मात्र संबंधित विभाग लक्ष देत नसल्यामुळेच भाविकांमध्ये नाराजी आहे. मंदिर विश्वस्थांच्या मिटिंगमध्ये याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
- बाळासाहेब लांबे, विश्वस्थ, सोमेश्वर मंदिर

Web Title:  Someshwara is bad for contaminated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.