केव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:40 AM2019-10-31T00:40:44+5:302019-10-31T00:41:04+5:30
केव्हा तरी पहाटे, लाजून हसणे अन हसून ते पाहणे, काळ्या मातीत मातीत, शोधू मी कुठे कशी तुला प्रिया, निसर्गराजा सांग एकतोय, गणनायका गणदैवताय अशी विविध भक्ती व भावगीतांनी रागिणी कामतीकर यांनी जेलरोड पहाट पाडवा कार्यक्रमात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
नाशिकरोड : केव्हा तरी पहाटे, लाजून हसणे अन हसून ते पाहणे, काळ्या मातीत मातीत, शोधू मी कुठे कशी तुला प्रिया, निसर्गराजा सांग एकतोय, गणनायका गणदैवताय अशी विविध भक्ती व भावगीतांनी रागिणी कामतीकर यांनी जेलरोड पहाट पाडवा कार्यक्रमात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
जेलरोड नारायणबापूनगर चौकात अनुज बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सोमवारी पहाटे आयोजित पहाट पाडवा कार्यक्रमात रागिणी कामतीकर यांनी घनशाम सुंदरा, मोगरा फुलला, ऐरणीच्या देवा तुला, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठुमाउली तू माउली जगाची, वासुदेव आला रे वासुदेव आला, उजळून आलं आभाळ अशी बहारदार गिते सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
यावेळी हार्मोनियमवर प्रमोद पवार, तबल्यावर आदित्य कुलकर्णी, आक्टोपॅडवर डॅनियल म्हस्के, सिंथेसायझरवर गजानन पळसोदकर, दिनेश निकम यांनी साथसंगत केली. निवेदन अनिरुद्ध कुर्तडीकर यांनी केले.
स्वागत संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत माळोदे व आभार संदीप ठाकूर यांनी मानले. यावेळी नगरसेवक प्रशांत दिवे, दिनकर आढाव, संजय भालेराव, आप्पा इनामदार, शेखर वाघ, राजू दुसाणे, रामजी पांडे, नाना कावळे, मनोज यादव, मनोज भागवत, जितेंद्र पगारे, संतोष ठाकूर, दीपक निकाळजे आदींसह रसिक उपस्थित होते.
‘सागरा प्राण तळमळला..’ देशभक्तिपर गीत सादर
सत्यम शिवम सुंदरम, केतकीच्या बनामध्ये नाचला गं मोर, अधीर मन हे झाले ही गीते सादर करत गाण्यातील बारकावेही सांगितले. नेहा मूर्ती यांनी दीपावली मनायी सुहानी हे गीत सादर केले. तर करण शिंदे यांनी देव पावलाय देव माझा मल्हारी, वेडात मराठे वीर दौडले सात व शेवटी सागरा प्राण तळमळला हे देशभक्तिपर गीत सादर केले.