किराणा बाजारात काहीसे घबराटीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:12 AM2021-05-31T04:12:06+5:302021-05-31T04:12:06+5:30
फ्लॉवर १२ रु. किलो बाजार समितीमध्ये बहुतेक फळभाज्यांना चांगला दर मिळत असला तरी फ्लॉवरला तुलनेत कमी दर मिळत ...
फ्लॉवर १२ रु. किलो
बाजार समितीमध्ये बहुतेक फळभाज्यांना चांगला दर मिळत असला तरी फ्लॉवरला तुलनेत कमी दर मिळत आहे. फ्लॉवर अवघी चार ते १२ रुपये किलो या दराने विकली जात आहे. कोबी १२ पासून २८ रुपये किलोंपर्यंत विकला जात आहे.
चौकट-
चिकू ४० रुपये किलो
सध्या सर्वच फळांना चांगली मागणी असून, फळांचे दर वाढले आहेत. घाऊक बाजारात चिकू २० ते ४० रुपये किलो, तर टरबूज अवघे चार ते साडेनऊ रुपये आणि खरबूज दहा ते १८ रुपये किलो दराने विकले जात आहे.
चौकट-
किराणा बाजारात मंदी
या सप्ताहात किराणा बाजारात काहीसे मंदीचे सावट असल्याचे दिसून आले. ग्राहकांची खरेदी कमी होती. तसेच केंद्राच्या धोरणाचाही बाजारावर परिणाम जाणवत आहे.
कोट-
किराणा बाजारात सध्या ग्राहक कमी असून, एक तारखेनंतर त्यात वाढ होण्याचा अंदाज आहे. सर्व डाळी आणि खाद्यतेलाच्या दरामध्ये काहीशी घसरण झाली असून, खाद्यतेलाचे दर लिटरमागे पाच रुपयांनी कमी झाले आहेत. - अनिल बुब, किराणा व्यापारी
कोट-
बारा दिवस बाजार समित्या बंद असल्याने शेतीमाल कोठे विकावा असा प्रश्न निर्माण झाला होता. काही शेतकऱ्यांना तर टोमॅटे फेकून द्यावे लागले. खरीप तोंडावर आला असल्याने आता भांडवलाची गरज भासणार आहे. - रावसाहेब पवार, शेतकरी
कोट-
सर्वसामान्यांना भाजीपाला महागच मिळतो आहे. यामुळे घरखर्च भागविताना कसरत करावी लागत आहे. डाळींचे भाव कमी झाल्याने थोडाफार दिलासा असला तरी त्यात काही मोठ्या प्रमाणात तफावत झालेली नाही - रंजना आहिरे, गृहिणी.