सोमपूरच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले सूर्यग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 11:05 PM2019-12-26T23:05:58+5:302019-12-26T23:07:09+5:30
गुरुवारी झालेले सूर्यग्रहण हे खास होते, कारण ते नऊ वर्षांनंतर घडून आले आणि पुढील सूर्यग्रहण हे १५ वर्षांनंतर होणार आहे.
ताहाराबाद : गुरुवारी झालेले सूर्यग्रहण हे खास होते, कारण ते नऊ वर्षांनंतर घडून आले आणि पुढील सूर्यग्रहण हे १५ वर्षांनंतर होणार आहे.
सूर्यग्रहणासंदर्भात अनेक गैरसमज आहेत, परंतु योग्य सुरक्षित मानांकित फिल्टर्सचा उपयोग करून बनविलेल्या खास गॉगल्सच्या माध्यमातून हा नैसर्गिक आविष्कार अनुभवता आला. सोमपूरच्या नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. डी. खैरनार यांच्या प्रेरणेने आणि विज्ञान शिक्षक एस. बी. राजपूत, व्ही. एम. सावंत आणि एस. के. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनाही हा सुंदर आविष्कार अनुभवता आला.
राजपूत यांनी महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हे सुरक्षित गॉगल्स उपलब्ध करून दिले. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना या नैसर्गिक आविष्काराची अनुभूती घेता आली.