चासच्या शेतकऱ्याचा मुलगा बनला नायब तहसीलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 09:12 PM2020-06-21T21:12:05+5:302020-06-21T23:59:29+5:30

नांदूरशिंगोटे : भोजापूर खोरे परिसरातील चास येथील गरीब व शेतकरी कुटुंबातील समाधान (रविंद्र) बाळासाहेब भाबड याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत नायब तहसीलदार होण्याचे स्वप्न साकारले आहे. तालुक्यातील शेतकºयाच्या मुलाने यश मिळविल्याबद्दल त्याचा गौरव करण्यात आला.

The son of a Chas farmer became the Deputy Tehsildar | चासच्या शेतकऱ्याचा मुलगा बनला नायब तहसीलदार

चास येथील समाधान भाबड याची नायब तहसीलदारपदी नियुक्ती झाल्याने ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आलेल्या सत्कारप्रसंगी बंडूनाना भाबड, केरू भाबड, बबनराव खैरनार, नंदा भाबड, प्रयागा जाधव आदी.

Next
ठळक मुद्देतालुक्याच्या नावलौकीकत भर टाकली.

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदूरशिंगोटे : भोजापूर खोरे परिसरातील चास येथील गरीब व शेतकरी कुटुंबातील समाधान (रविंद्र) बाळासाहेब भाबड याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत नायब तहसीलदार होण्याचे स्वप्न साकारले आहे. तालुक्यातील शेतकºयाच्या मुलाने यश मिळविल्याबद्दल त्याचा गौरव करण्यात आला.
लहानपणी पितृछत्र हरवल्यानंतर आईने काबाडकष्ट करुन दिलेल्या शिक्षणामुळे माऊलीच्या कष्टांचे सार्थक झाले आहे. त्याच्या यशाबद्दल बंडूनाना भाबड, केरू भाबड, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष बबनराव खैरनार, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदा भाबड, पोलिस पाटील प्रयागा जाधव, बाजार समितीचे संचालक संजय खैरनार, मुख्याध्यापक एस. डी. शिरसाठ, भारत भाबड, संदीप भाबड, राजेश भाबड आदींच्या उपस्थितीत समाधानचा सत्कार करण्यात आला. आजोबा, वडील दोघेही शेतकरी. घरातील परिस्थिती तशी बेताचीच. त्यातच वडिलांचे अल्पशा आजाराने निधन झाले आणि कुटुंबाचा आधारस्तंभ निखळून पडला. मात्र माय माऊलीने खचून न झाता, कुटुंबाची जबाबदारी शिरावर घेत काबाडकष्ट करुन मुलांना शिकवले. समाधान शिक्षण घेताना शेतमजुरी करुन कुटुंबाचा गाडा हाकणाºया आईला मदत केली. आईच्या कष्टाची जाणीव ठेवून त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षेत दैदिप्यमान यश प्राप्त केले. कुटूंबाबरोबर गावाच्या आणि तालुक्याच्या नावलौकीकत भर टाकली.

Web Title: The son of a Chas farmer became the Deputy Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.