सद्भावनेच्या लढाईतील सुपुत्र : अनिल अवचट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:30 AM2019-03-27T00:30:18+5:302019-03-27T00:30:35+5:30
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिक्षणतज्ज्ञ अरुण ठाकूर यांच्या रूपाने समाजाने सद्भावनेच्या लढाईतील एक सुपुत्र गमावला आहे. आजच्या काळात त्यांच्यासारखा धर्मनिरपेक्ष विचारांचा माणूस होणे हा त्या वृत्तीचा एकप्रकारे पराभव ठरतो, अशी भावना ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त के ली.
नाशिक : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिक्षणतज्ज्ञ अरुण ठाकूर यांच्या रूपाने समाजाने सद्भावनेच्या लढाईतील एक सुपुत्र गमावला आहे. आजच्या काळात त्यांच्यासारखा धर्मनिरपेक्ष विचारांचा माणूस होणे हा त्या वृत्तीचा एकप्रकारे पराभव ठरतो, अशी भावना ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त के ली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरु ण ठाकूर यांची स्मरणसभा वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प. सा. नाट्यगृहात मंगळवारी (दि.२६) झाली. यावेळी अवचट बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, शांताराम चव्हाण, ‘आनंदनिकेतन’च्या मुख्याध्यापक विनोदिनी काळगी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अवचट म्हणाले, ठाकूर यांच्याशी आपली बहुधा जन्मापासून मैत्री असावी. आयुष्यात अत्यंत वाईट दिवस काढणाऱ्या अरु ण यांनी कोणत्याही कामाची कधीही लाज बाळगली नाही. प्रत्येक गोष्टीत विनोद शोधण्याची सवय त्यांच्यामुळे लागली. ठाकूर हे विविध संदर्भांचा महाकोश होते असे ते म्हणाले़ तसेच पाटील म्हणाले, अरुण ठाकूर हे पुरोगामी विचारसरणीचे होते. पुरोगामित्व त्यांच्या अंगभूत होते. ठाकूर यांच्यासारखी दीपकलिका नाशिकच्या निरांजनात उभी राहते, हे मोठे भाग्यच म्हणावे. गांधी, आंबेडकर समजावून सांगणाऱ्या ठाकूर यांच्याशी वेगळेच नाते जोडले गेले होते, असे शांताराम चव्हाण यांनी सांगितले. आनंदनिकेतन शाळेची भूमिका, पायाभूत तत्त्वे ठरविण्यामध्ये तसेच शाळेच्या प्रगतीमध्ये ठाकूर यांचे मोठे योगदान राहिले आहे, असे विनोदिनी काळगी यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, निशा शिऊरकर, सुनीती सु. र., मंगला खिंवसरा, वासंती दिघे, अर्जुन कोकाटे, श्रीधर देशपांडे, करुणासागर पगारे यांनीही भावना व्यक्त केल्या. अनिता पगारे यांनी सूत्रसंचालन केले.
माणसांवर प्रेम करणारा माणूस
पुरोगामी आचार, विचारांमुळे धर्मनिरपेक्ष वृत्तीने हा माणूस आयुष्यभर जगत आला. समाजवादी चळवळीपुढे ठाकूर यांच्या रूपाने असलेला आदर्श काळाने हिरावला असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले.