जळगाव निंबायती सरपंचपदी सोनाली कर्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:16 AM2021-02-13T04:16:15+5:302021-02-13T04:16:15+5:30
जळगाव निंबायती : मालेगाव तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर जळगाव निंबायती ग्रामपंचायतीच्या इतर मागास प्रवर्गातील महिला सरपंच पदासाठी आरक्षित ...
जळगाव निंबायती : मालेगाव तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर जळगाव निंबायती ग्रामपंचायतीच्या इतर मागास प्रवर्गातील महिला सरपंच पदासाठी आरक्षित असलेल्या जागेवर महेंद्र पाटील समर्थक सोनाली नामदेव कर्हे यांची सरपंचपदी, तर महेंद्र पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीमध्ये आमदार सुहास कांदे यांचे समर्थक तथा सेना उपजिल्हाप्रमुख महेंद्र पाटील यांच्या ग्रामविकास पॅनलला १३ पैकी १० असे पूर्ण बहुमत प्राप्त झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी संजय काळे यांनी काम पाहिले. ग्रामसेवक एस. जी. पारखे उपस्थित होते. सर्व नवनिर्वाचित तेरा सदस्यांनी एकमताने ठराव करून सरपंच व उपसरपंच यांची बिनविरोध निवड केली. वृक्षमित्र स्वर्गीय रोडूअण्णा पाटील यांच्या समाधीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंचासह सर्व सदस्यांचा सत्कार केला. फटाक्यांची आतषबाजी करून गावात एकच जल्लोष केला.