सोनाली पवार ‘मिसेस इंडिया इंटरनॅशनल’

By Admin | Published: February 19, 2017 12:47 AM2017-02-19T00:47:21+5:302017-02-19T00:47:40+5:30

सोनाली पवार ‘मिसेस इंडिया इंटरनॅशनल’

Sonali Pawar 'Mrs India International' | सोनाली पवार ‘मिसेस इंडिया इंटरनॅशनल’

सोनाली पवार ‘मिसेस इंडिया इंटरनॅशनल’

googlenewsNext

नाशिक : पटाया, थायलंड येथे पार पडलेल्या मिसेस इंडिया इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेत नाशिकच्या सोनाली पवार यांनी ‘मिसेस इंडिया इंटरनॅशनल’चा किताब पटकावला असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.  ३५ वयोगट, ४० वयोगट, ५० वयोगट यामध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत ३५ च्या पुढील गटात सोनाली या ‘डिव्होटेड ब्यूटी’ एकमेव व प्रथम विजेत्या ठरल्या. ११ फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा थायलंडच्या पटाया येथे पार पडली. या स्पर्धेत ऐश्वर्या घाटगे यांनी ‘मिसेस इंटरनॅशनल ब्यूटी विथ पर्पज’, श्रृती क्लॅरन्स या ‘मिसेस इंटरनॅशनल ब्यूटी विथ ब्रेन’, शर्वानी बत्रा ‘मिसेस इंटरनॅशनल ब्यूटी आयकॉनिक आईज’, तर पूजा कोहली यांनी ‘ब्यूटी विथ ब्यूटीफुल स्माईल’चा किताब पटकावला. सिन्नर येथे जन्मलेल्या सोनाली पवार अर्थात पूर्वाश्रमीच्या रेश्मा भाटजिरे यांचे वडील माजी लष्कर कर्मचारी आणि शेतकरी होते. सिन्नरच्या महात्मा जोतिबा फुले हायस्कूलमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. २००६ मध्ये त्यांचे कुटुंब हैदराबादला स्थलांतरित झाले. त्यानंतर त्यांच्या आयुष्याला वेगळेच वळण लागले. तरुणपणापासून सोनाली यांना अभिनय व मॉडेलिंगची आवड होती. २००७ मध्ये सलमान खानच्या ‘वॉँटेड’ चित्रपटात सहकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी या क्षेत्रात छोट्या-मोठ्या प्रकारचे प्रोजेक्ट केले. २०१० ला पवार कुटुंबीय पुन्हा नाशिकला परतले. कौटुंबिक जबाबदाऱ्यांबरोबरच त्यांनी सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली.  २०१३ मध्ये ‘मिसेस नाशिक’ हा किताब त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी काही चित्रपटांमधूनही कामे केली. पुण्यात झालेल्या ‘मिसेस महाराष्ट्र’ स्पर्धेत त्यांनी ‘मिसेस महाराष्ट्र फोटोजेनिक २०१६’ हा किताब पटकावला. त्यानंतर ‘मिसेस इंडिया इंटरनॅशनल २०१७’ मध्ये त्या सहभागी झाल्या व निर्धारित वयोगटात त्यांनी सदर किताब पटकावला. (प्रतिनिधी)

Web Title: Sonali Pawar 'Mrs India International'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.