सोनांबेची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:15 AM2021-05-06T04:15:45+5:302021-05-06T04:15:45+5:30
कटुप्रसंग घडल्यानंतर सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीसपाटील यांनी तातडीची बैठक घेऊन ग्रामस्थांच्या सहमतीने गाव बंद करून कोरोनामुक्त करण्यासाठी यशस्वी प्रयत्न ...
कटुप्रसंग घडल्यानंतर सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीसपाटील यांनी तातडीची बैठक घेऊन ग्रामस्थांच्या सहमतीने गाव बंद करून कोरोनामुक्त करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. कोनांबे व सोनारी गावात कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. मात्र सोनांबेचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व पोलीसपाटील यांनी गाव बंद करण्याचा योग्य निर्णय घेतला. त्यामुळे गावात फक्त आठ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. गावात जंतुनाशक औषध फवारणी करून गावात ज्येष्ठांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे.
प्रत्येकाने मास्क लावून सोशल डिस्टन्स पाळावे, सॅनिटायझरने वारंवार हात स्वच्छ करावे व आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन सरपंच या नात्याने डॉ. पवार यांनी ग्रामस्थांना केले. कोरोनाबाधित व्यक्तीला बेड उपलब्ध करून देण्यासाठी व रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी सरपंच पवार व ग्रामपंचायतीने कसोशीने प्रयत्न केले आहेत. कोविडजन्य परिस्थितीमध्ये शासकीय निधी उपलब्ध होणे अवघड असल्याने सद्य:स्थितीत गावाच्या विकासाचा विचार दूर ठेवून कोरोनाची परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सरपंच डॉ. पवार यांनी सांगितले.
इन्फो..-
कोरोनामुक्त गाव मोहिमेचा मोलाचा वाटा जिल्हा परिषद शाळेमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करून कोरोनाबाधित रुग्णांना या कक्षात राहण्याची विनंती करण्यात आली. ‘कोरोनामुक्त सोनांबे’ ही मोहीम राबविणे म्हणजे ग्रामपंचायतीपुढे एक आव्हान होते व ते पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत पूर्ण प्रयत्न करत आहे. कोरोनामुक्तीसाठी ग्रामस्थांच्या काही सूचना असतील तर त्या राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास सरपंच डॉ. रवींद्र पवार यांनी दिला.