सोनांबे शिवारात बछड्यांसह बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 02:09 PM2019-04-03T14:09:25+5:302019-04-03T14:09:33+5:30

सिन्नर :-तालुक्यातील सोनांबे येथील सालखडी भागात पाच दिवसांपासून बिबट्यासह दोन बछड्यांचा वावर वाढला असून शेतकयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

 Sonambo Shivarata leopard with boats | सोनांबे शिवारात बछड्यांसह बिबट्याचा वावर

सोनांबे शिवारात बछड्यांसह बिबट्याचा वावर

Next

सिन्नर :-तालुक्यातील सोनांबे येथील सालखडी भागात पाच दिवसांपासून बिबट्यासह दोन बछड्यांचा वावर वाढला असून शेतकयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. बिबट्या घरांजवळ येऊन डरकाळ्या फोडत असल्याने शेतकऱ्यांना स्वत:ची घरे सोडून दुसरीकडे वास्तव्यास राहण्याच्या निर्णयापर्यंत आले आहेत. याबाबत वनविभागाला माहिती दिली असली, तरी त्याला पकडण्यासाठी कार्यवाही झाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अर्जुन जगताप यांच्या घराजवळ रविवारी बिबट्या दोन बछड्यांसह आल्याने संपूर्ण कुटुंब घाबरले होते. बºयाच वेळाने बिबट्या व बछड्यांनी तेथून काढता पाय घेतला. सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास विठ्ठल केरू पवार वीजपंप सुरू करण्यासाठी गेले असता बिबट्या व बछड्याचे दर्शन घडले. त्यांनी वस्तीवरील शेतकऱ्यांना मदतीसाठी बोलावले. मदतीसाठी आलेले ज्ञानेश्वर बोडके बिबट्याला हुसकावून लावले. पाच व शेतकयांनी आरडाओरड करून दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून, शेतातील कामे करण्यासही शेतकरी, शेतमजूर धजावत नाही. पाळीव जनावरांवर हल्ले होण्याची भीतीही आहे.बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी धास्तावले असून या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याचीही मागणी केली जात आहे.

Web Title:  Sonambo Shivarata leopard with boats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.