सोनपावली आली गौराई

By Admin | Published: September 9, 2016 02:00 AM2016-09-09T02:00:19+5:302016-09-09T02:01:14+5:30

प्रतिष्ठापना : घराघरात महालक्ष्मीचे विधिवत पूजन

Sonawavali came Gaurai | सोनपावली आली गौराई

सोनपावली आली गौराई

googlenewsNext

नाशिक : ‘गौरी आली सोन्या-मोत्यांच्या पावलांनी’ असे म्हणत गुरुवारी (दि. ८) शहरात घरोघरी महिला सवाष्णींकडून माहेरवाशीण महालक्ष्मीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गणपतीपाठोपाठ माहेरवाशीण गौरींचे अर्थात महालक्ष्मीचे आज आगमन झाले. घरातील सवाष्णींनी गौरीच्या पावलांनी धान्याचे माप ओलांडून आणि औक्षण करून गौरींची स्थापना केली. यावेळी गौरींचा विशेष थाट बघायला मिळाला. ठुशी, छल्ला, मेखला, बाजूबंद (वाकी), नथ, पैसाहार, लक्ष्मीहार, पोहेहार, बोरमाळ, ठुशीचे कानातले, बांगड्या, कंबरपट्टा, मुकुट, पुतळी, मोहनमाळ, तोडे, दुहेरी हार, शाही हार या अलंकारांनी गौरींचे रूप अधिकच खुलून दिसत होते.
या गौरींच्या आगमनाने सर्वत्र चैतन्याचे वातावरण बघायला मिळाले. गुरुवारी गौरींचे आवाहन झाल्यानंतर शुक्रवारी (दि.९) त्यांचे पूजन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sonawavali came Gaurai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.