गायक मुकेश यांच्या जयंतीनिमित्त गीतसंध्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:20 AM2019-07-24T00:20:46+5:302019-07-24T00:21:11+5:30
क्या खूब लगती हो, चंचल शीतल निर्मल कोमल, कही दूर जब दिन ढल जाये, वो तेरे प्यार का गम अशा एक ना अनेक सदाबहार गीतांची मेजवानी इंदिरानगरवासीयांना अनुभवायला मिळाली.
नाशिक : क्या खूब लगती हो, चंचल शीतल निर्मल कोमल, कही दूर जब दिन ढल जाये, वो तेरे प्यार का गम अशा एक ना अनेक सदाबहार गीतांची मेजवानी इंदिरानगरवासीयांना अनुभवायला मिळाली.
निमित्त होते, स्वर्गीय गायक मुकेश यांच्या वाढदिवसाचे. इंदिरानगर येथील स्वर्णीम सभागृहात वीरेंद्रसिंग परदेशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बालाजी म्युझिकल इव्हेंट्स आयोजित स्वर्गीय गायक मुकेश यांच्या गीतांनी रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमास शहर वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त अशोक नखाते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नखाते यांनी यावेळी वाहतुक नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला़ आॅर्केस्ट्रा असोसिएशनचे उमेश गायकवाड, फारुख पिरजादे आदींसह ज्येष्ठ गायकांचा सन्मान करण्यात आला. प्रास्तविक वीरेंद्रसिंग परदेशी यांनी केले. ध्वनी संयोजन प्रमोद कदम यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रवीण पोतदार यांनी केले.