सोनोग्राफी केंद्रांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:15 PM2018-04-11T23:15:31+5:302018-04-11T23:15:31+5:30
सटाणा : वाढत्या तक्रारींमुळे आरोग्य विभागाची मोहीम सटाणा : वाढत्या तक्रारींमुळे शहर व तालुक्यात सोनोग्राफी केंद्र तपासणीसाठी आरोग्य विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. २० सोनोग्राफी केंद्रे व शासनमान्य दोन गर्भपात केंद्रांची पीसीएनडीटी कायद्यांतर्गत नुकतीच तपासणी करण्यात आली. मात्र तक्र ारी असूनही या तपासणी पथकाने सर्वांनाच क्लीन चिट दिल्याने यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
सटाणा : वाढत्या तक्रारींमुळे आरोग्य विभागाची मोहीम सटाणा : वाढत्या तक्रारींमुळे शहर व तालुक्यात सोनोग्राफी केंद्र तपासणीसाठी आरोग्य विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. २० सोनोग्राफी केंद्रे व शासनमान्य दोन गर्भपात केंद्रांची पीसीएनडीटी कायद्यांतर्गत नुकतीच तपासणी करण्यात आली. मात्र तक्र ारी असूनही या तपासणी पथकाने सर्वांनाच क्लीन चिट दिल्याने यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राज्यात स्त्रीभ्रूणहत्येचे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस येत असल्याच्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजाराम शेंद्रे, नायब तहसीलदार विनोद चव्हाण, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सटाणा शहर व तालुक्यातील सोनोग्राफी केंद्रे व शासनमान्य गर्भपात केंद्रांची पाहणी करून तपासणी केली. या तपासणी अंतर्गत सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांचा परवाना नूतनीकरण केलेला आहे की नाही, पूर्वी सील केलेल्या सोनोग्राफी मशीनची सद्यस्थिती तसेच चालू व कार्यरत केंद्रांमध्ये दाखल असलेले रुग्ण व कायदेशीर परवान्यांच्या रेकॉर्डची तपासणी करण्यात आली. क्लीन चिट दिल्याने साशंकताशासनाच्या वेबसाइटवर आॅनलाइन तक्र ारी प्राप्त झाल्या आहेत, अशा केंद्रांची शहानिशा करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. या तपासणीचा अहवाल प्रशासनाला सादर होईल. मात्र स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात असून, याबाबत तक्र ारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. मोहिमेअंतर्गत तपासणी करूनही सर्वांना क्लीन चिट दिल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.