बालरुग्णालयात सोनोग्राफी मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 10:22 PM2020-09-04T22:22:26+5:302020-09-05T00:54:07+5:30
मालेगाव : येथील महिला व बाल- रुग्णालयात सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.
मालेगाव : येथील महिला व बाल- रुग्णालयात सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.
कृषिमंत्री भुसे म्हणाले की, महिलांच्या वैद्यकीय सोयी लक्षात घेता महिला व बालरु ग्णालयात सोनोग्राफी मशीनची उपलब्धता करून देण्यात आल्याने या सुविधेचा निशुल्क लाभ घ्यावा, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे सदरचे रुग्णालय दिनांक १९ सप्टेंबर २०१९ रोजी कार्यान्वित झाले असून, आजपर्यंत एक हजार १२० महिलांची प्रसूती व ५०० महिलांचे सिझेरिअन झाले आहे.
महिला भगिनी वैद्यकीय सुविधांचा लाभ घेत आहे. महिला व बालरु ग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे भुसे यांनी सांगितले. कार्यक्रमास महेंद्र पाटील, रेडिओलॉजिस्ट अक्षय पवार, हितेश महाले, सुवर्णा पवार, शीतल शिंदे, फातिमा, शिरोळे, अधिपरिचारिका शैलजा ब्राम्हणे, मोगल, कानडे, निकम, तबस्सुम शहा, नगरसेविका पुष्पा गंगावणे, संगीता चव्हाण, छायाताई शेवाळे, राजेश अलिझाड, क्रांती पाटील, सुनील पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.