सोनोशी शाळेत मुलांना ‘एक हात मदतीचा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:35 AM2020-12-04T04:35:42+5:302020-12-04T04:35:42+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या आदिवासी भागातील सोनोशी येथील जिल्हा परिषद शाळेतील २२ मुलांना ‘एक हात मदतीचा’ ...

Sonoshi helps children at school | सोनोशी शाळेत मुलांना ‘एक हात मदतीचा’

सोनोशी शाळेत मुलांना ‘एक हात मदतीचा’

Next

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या आदिवासी भागातील सोनोशी येथील जिल्हा परिषद शाळेतील २२ मुलांना ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत मुख्याध्यापक कोंडाजी भांगरे, सरपंच दिलीप पोटकुले व केंद्रप्रमुख कैलास भवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे मदतीसाठी नागरिक पुढे येत असतानाच इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या आदिवासी भागातील सोनोशी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना परीक्षेच्या काळात उपयोगी असलेली भाषा, इंग्रजी, गणित या महत्त्वाच्या विषयांची पुस्तके अभियंता संदीप वाजे यांच्या स्वखर्चातून वाटप करण्यात आली.

या कार्यक्रमप्रसंगी एक हात मदतीचा विचार मंचचे अभियंता संदीप वाजे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, सोनोशीचे सरपंच दिलीप पोटकुले, उपसरपंच नंदू भांगरे, रामभाऊ पाटील धोंगडे, ग्रामपंचायत सदस्या मंदा धोंगडे, शालेय समितीचे अध्यक्ष सुदाम पेढेकर, केंद्रप्रमुख कैलास भवारी, मुख्याध्यापक कोंडाजी भांगरे, पंढरी साबळे, लक्ष्मण धोंगडे, अनुसया झोले, निवृत्ती झोले, सुरेखा भांगरे, अलका धोंगडे, दत्तात्रय मुंडे, काशीनाथ घारे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन केंद्रप्रमुख कैलास भवारी यांनी केले, तर अनुमोदन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कोंडाजी भांगरे यांनी केले.

-------------

‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाअंतर्गत मोफत पुस्तकांचे वाटप करताना अभियंता संदीप वाजे. समवेत मुख्याध्यापक कोंडाजी भांगरे, सरपंच दिलीप पोटकुले, राम शिंदे, कैलास भवारी व इतर ग्रामस्थ. (०२ नांदूरवैद्य२)

===Photopath===

021220\02nsk_12_02122020_13.jpg

===Caption===

(०२ नांदूरवैद्य२)

Web Title: Sonoshi helps children at school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.