सोनू नवरे या आदिवासी मुलाने मिळवले सुवर्ण पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 05:47 PM2018-12-03T17:47:55+5:302018-12-03T18:06:06+5:30
ब्राह्मणगाव : येथील आदिवासी कुटुंबातील बारावी शिक्षण झालेल्या व पुढे परिस्थिती अभावी शिक्षण बंद झालेल्या १८ वर्षाचा सोनू केवळ ...
ब्राह्मणगाव : येथील आदिवासी कुटुंबातील बारावी शिक्षण झालेल्या व पुढे परिस्थिती अभावी शिक्षण बंद झालेल्या १८ वर्षाचा सोनू केवळ नवरे या आदिवासी मुलाने १७ नोव्हेंबर रोजी जम्मू काश्मीर येथे रु रल गेम्स आॅर्गनैजेशन आॅफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय क्र ीडा स्पर्धेत ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून प्रथम क्र मांक मिळवला. पाच हजार मीटर स्पर्धा त्याने १२ मिनिट ५८ सेकंदात पार पाडली. आता नेपाल येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्र ीडा स्पर्धा साठी त्याची निवड झाली असून या स्पर्धेसाठी लागणाºया आर्थिक खर्चाची जबाबदारी ग्रामपंचायतीने स्वीकारल्याचे जाहीर करण्यात आले. या सुयशाबद्दल ग्रामपंचायतीचे वतीने त्याचा माजी सरपंच सुभाष अहिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ग्रामपंचायतीचे सदस्य जगदीश अहिरे, विनोद अहिरे, दत्तात्रेय खरे, धर्मा पारखे, ग्रामविकास अधिकारी पी. के. बागुल, अशोक जगताप, बाळा शेवाळे, अतुल खरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत नंतर सोनू नवरे हाही आदिवासी युवक देशात महाराष्ट्र व नाशिक जिल्ह्याचे नाव लौकिक मिळवून आल्याने जिल्ह्याला धावण्याच्या स्पर्धेत पुन्हा एक गोल्ड मेडीलिस्त मिळाला आहे.
सोनू केवळ नवरे हा आदिवासी कुटुंबातील युवक घरची परिस्थिती आर्थिक हलक्याची आहे. आई, वडील, तीन भाऊ घरची पाच एकर कोरड वाहू शेती असल्याने दुसरीकडे मोलमजुरी करून आपला प्रपंच चालवतात. शेतमजुरी करतांना सोनुने धावण्याच्या सराव चालू ठेवला. त्याच्या या चिकाटीमुळे दाभाडी (ता. मालेगाव) येथील धावपटू राकेश खैरनार यांचे मार्गदर्शन मुळे सोनू या स्पर्धेत भाग घेऊन सुवर्ण पदक विजेता झाला आहे. पुढील शिक्षण तो परिस्थिती अभावी घेऊ शकत नाही मात्र यात करियर करण्याचा त्याचा मानस आहे.
जम्मू काश्मीर येथे रु रल गेम्स आर निझेशन आॅफ इंडिया चे संस्थापक जनरल सेक्रेटरी मा. थापा यांचे हस्ते सोनूला सुवर्णपदक देण्यात आले आहे.