नदी पुनरुज्जीवन कार्यक्र म लवकरच
By Admin | Published: September 30, 2016 11:16 PM2016-09-30T23:16:45+5:302016-09-30T23:17:16+5:30
सुभाष भामरे : आरम, हत्ती, कान्हेरी नद्यांचा समावेश
सटाणा : बागलाण तालुका पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन शिवार तेथे पाणी उपलब्ध करण्यासाठी विविध सिंचन योजना हाती घेतल्या आहेत. त्याच्या पहिल्या टप्प्यात नदी पुनरूज्जीवन कार्यक्रमांतर्गत आरम, हत्ती आणि कान्हेरी या तीनही नद्यांवर चौदा भूमिगत कॉँक्रीट बंधारे प्रस्तावित करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.
बागलाण तालुक्यातील पाणी समस्या सोडविण्याला आपण अग्रक्र म दिला असल्याचे असल्याचे स्पष्ट करत डॉ. भामरे म्हणाले की, पावसाच्या लहरीपणामुळे तालुका नेहमीच जलसंकटाशी सामना करत आला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेल्याने ही भयावह परिस्थिती निर्माण झाली असून, ही समस्या दूर करण्यासाठी पहिल्या टप्प्यात आरम, हत्ती आणि कान्हेरी या नद्यांवर नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्र मांतर्गत आरम नदीवरील मुंजवाड, मळगाव, खमताणे, हत्ती नदीवरील औंदाणे, मुंजवाड, वटार, चौंधाणे, वनोली, तरसाळी, विंचुरे, कंधाणे, जोरण व कान्हेरी नदीवरील वटार, वनोली येथील शिवारात चौदा भूमिगत सिमेंट बंधारे प्रस्तावित करण्यात आले आहेत. ही कामे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, त्यासाठी बारा कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचे डॉ.भामरे यांनी सांगितले. या कामामुळे पिण्याचा व शेतीचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मोसम, करंजाडी व दोध्याड या नद्यांवर नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी उपलब्धतेची समस्या सोडविण्याचाही आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. हरणटेकडी, साल्हेर व गणपती घाट या वळण योजना पूर्ण झाल्या आहेत. (वार्ताहर)
सून सुमारे ५३ दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे.हे पाणी गुजरातकडे वाहून जात होते .वाघंबा (शेरमाळ )डोंगरावरील पाणी देखील गुजरातकडे मोठ्याप्रमाणात वाहून जात आहे.ते पाणी मोसम नदीत वळविण्यासाठी नव्याने वळण योजना तयार करण्यात येणार आहे.त्याचे लवकरच सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंत्यांना दिल्या आहेत.
जलयुक्त शिवारअंतर्गत तेरा बंधारे
बागलाणमध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत यंदा तेरा गावांना कॉँक्र ीट बंधारे मंजुरीसाठी सादर करण्यात आल्याचे भामरे यांनी सांगितले. त्याच्यात सुराणे व देवळाणे येथे प्रत्येकी दोन, भाक्षी, दरेगाव, टेंभे खालचे, टेंभे वरचे, कांद्याचा मळा, जामोटी, अजमीर सौंदाणे, बिजोटे, पारनेर येथे प्रत्येकी एक कॉँक्र ीट बंधारा बांधण्यात येणार आहे. त्यापैकी बिजोटे व पारनेर येथील बंधाऱ्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, निविदा स्तरावर आहे.
मोसम, आरम नदीवर येणार केटीवेअर ....
४बागलाण तालुक्यातील नद्या बारमाही करण्यासाठीही आपला शासनस्तरावर प्रयत्न सुरू असून, त्यासाठी मोसम नदीवर पाच ठिकाणी व आरम नदीवर चार ठिकाणी केटीवेअर बंधारे मंजुरीसाठी सादर करण्यात आले असल्याचे डॉ.भामरे यांनी सांगितले. त्याच्या सोमपूर, नामपूर, मोराणे येथे प्रत्येकी एक व अंबासन येथे दोन केटीवेअर बंधारे प्रस्तावित करण्यात आले आहेत तर आरम नदीवरील चौंधाणे, कंधाणे, मुंजवाड, दहिंदुले येथे प्रत्येकी एक बंधारा घेण्यात येणार आहे. या सर्व बंधाऱ्यांची क्षमता पाच दशलक्ष घनफुटाच्या आत राहणार आहे. त्याच्यात नामपूर येथील ४.८७ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या बंधाऱ्याला तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. हे साखळी पद्धतीचे बंधारे राहणार असल्यामुळे या नद्या बारमाही होऊन पाणीप्रश्न निकाली काढण्यास मदत होणार आहे.
तळवाडे भामेरसाठी सतरा कोटी रुपयांचा निधी
४तळवाडे भामेर पोच कालव्याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी शासनाने सतरा कोटी रु पयांचा निधी नुकताच मंजूर केला असल्याचे डॉ.भामरे यांनी सांगितले. या कामामुळे काटवनचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. तसेच हरणबारी डाव्या कालव्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. हे काम मार्गी लावण्यासाठी सुधारित जलनियोजनस मान्यता घेतली आहे. प्रलंबित कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव समितीपुढे सादर करण्यात आला असून, या कामासाठी ५९ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. हरणबारी उजव्या कालव्याच्या पुढील कामासाठी तत्कालीन सरकारने पाणी उपलब्ध नसल्याचे कारण दाखवत नकार दिला होता. हे काम मार्गी लावण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांनी हिरवा कंदील दिला असून, पारनेर ते सातमानेपर्यंत कालव्याचे नव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी केल्याचे भामरे यांनी सांगितले.